Alert: अनोळखी नंबरवरील फोन टाळा! मोदी सरकारचा भारतीयांना सल्ला

दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी भारतीयांना वाढत्या ऑनलाइन घोटाळ्यांचे प्रकार लक्षात घेता अनोळखी नंबरवरून आलेले कॉल उचलू नका आणि सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
Online Scams| Unknown Number
Online Scams| Unknown NumberDainik Gomantak

Unknown Number: भारतात ऑनलाइन घोटाळे प्रमाण सातत्याने वाढत आहेत. काही महिन्यांपासून लोकांना आंतरराष्ट्रीय कॉल्स आणि मॅसेज येत आहेत. घोटाळेबाज आता व्हॉट्सअॅपची मदत घेऊन लोकांचे बँक अकाउंट खाली करत आहे.

फ्रॉडचे वाढते प्रमाण पाहता आणि खबरदारी घेण्यासाठी दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी भारतीयांना अनोळखी नंबरवरून कॉल न उचलण्याची विनंती केली आहे. 

  • अनोलखी नंबरवरुन आलेले कॉल उचलू नका

स्पॅम कॉल्स आणि वाढत्या फसवणुकीबद्दल विचारले असता, त्यांनी देशभरात राहणाऱ्या लोकांसाठी महत्त्वाच्या विनंतीवर भर दिला. त्यांनी "Unknown Number" वरून आलेल्या मोबाईल फोन कॉलला उत्तर देण्यापासून परावृत्त करण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, 'लोकांनी अनोळखी नंबरवरून आलेल्या कॉलला उत्तर देऊ नये. मी प्रत्येक भारतीयाला (India) विनंती करतो की त्यांनी ओळखीच्या असलेल्या नंबरच्या कॉलला उत्तर द्यावे.

Online Scams| Unknown Number
Earthquake In Haryana: झज्जरमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के, रिश्टर स्केलवर 2.5 तीव्रता
  • 40 लाख सिम ब्लॉक करण्यात आले

अश्विनी वैष्णव यांनी पुढे सांगितले की दूरसंचार मंत्रालयाने सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी अतिरिक्त उपाययोजना केल्या आहेत. 

वैष्णव यांनी स्पॅम कॉल्स आणि सायबर फ्रॉडचा सामना करण्यासाठी मंत्रालयाने अलीकडेच 'संचार साथी' पोर्टल सुरु केले आहे. त्यांनी उघड केले की सरकारने 40 लाखांहून अधिक बनावट सिम कार्ड आणि 41,000 अनधिकृत 'पॉइंट ऑफ सेल' एजंटना ब्लॅत लिस्टमध्ये टाकले आहे.

  • संचार साथी काय आहे?

संचार साथी हे आर्टिफिशियल इंटेलिजन्स-आधारित पोर्टल आहे. ज्याचा उद्देश युजर्संना ऑनलाइन टेलिकॉम फसवणूक रोखण्यात मदत करणे आहे. 

पोर्टलमध्ये विविध फिचर्स आहेत जी वैयक्तिक डेटा सुरक्षित करण्यात आणि युजर्संना त्यांच्या फोन कनेक्शनवर नियंत्रण ठेवण्यास मदत करतात. 

हे पोर्टल हरवलेल्या किंवा चोरीला गेलेल्या फोनशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यात मदत करते. युजर्संना त्यांचा हरवलेला फोन शोधण्याची सुविधा दिली जाते. 

मॅसेज एन्क्रिप्शन, सुरक्षित वेब ब्राउझिंग, फायरवॉल संरक्षण यासारख्या युजर्संना सुरक्षित ठेवण्यासाठी संचार साथी पोर्टल कार्य करते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com