PM Modi And Vladimir Putin 
ग्लोबल

India Russia Relations: भारत रशिया यांच्यात होणार मोठा करार; पुतिन सरकारच्या सहकार्याने बनवला ‘हा’ प्लॅन

India Russia Relations: भारत आणि इराण यांच्यातील चाबहार बंदराविषयीचा करार झाल्यानंतर पाकिस्तान आणि चीनला चांगलीच मिर्ची लागली.

Manish Jadhav

India Russia Relations: भारत आणि इराण यांच्यातील चाबहार बंदराविषयीचा करार झाल्यानंतर पाकिस्तान आणि चीनला चांगलीच मिर्ची लागली. यातच आता, भारताने रशियाबरोबर मोठा करार करण्याची तयारी सुरु केली आहे. भारत आणि रशियाचे संबंध पूर्वीपासूनच खूप मजबूत आहेत पण आता या संबंधांना आणखी एक आयाम जोडला जाणार आहे. भारत आणि रशियामध्ये मोठा करार होऊ शकतो. भारत आणि रशिया जूनमध्ये द्विपक्षीय करारावर विचारमंथन सुरु करतील. रशियाच्या एका मंत्र्याने याबाबत माहिती दिली आहे.

आरटी न्यूजनुसार, रशियाच्या आर्थिक विकास मंत्रालयाच्या संचालक निकिता कोंड्रात्येव यांनी सांगितले की, भारत आणि रशिया व्हिसा मुक्त पर्यटन सुरु करण्याच्या अंतिम टप्प्यात आहेत. कझान येथे सुरु असलेल्या आंतरराष्ट्रीय आर्थिक मंच (रशिया – इस्लामिक वर्ल्ड) कझान फोरम 2024 मध्ये रशियाच्या मंत्र्याने हे वक्तव्य केले.

वर्षअखेरीस करार होईल

निकिता कोंद्रतयेव यांनी सांगितले की, रशिया आणि भारत त्यांचे पर्यटन संबंध दृढ करण्यासाठी जूनपासून चर्चा सुरु करतील आणि वर्षाच्या अखेरीस मोफत पर्यटक व्हिसा निश्चित केला जाईल. रशियाने चीन आणि इराणबरोबर आधीच स्थापित केलेल्या विनामूल्य पर्यटक व्हिसाच्या देवाणघेवाणीच्या यशाचा विस्तार करण्याची योजना आखली आहे. रशिया आणि चीन यांच्यात मोफत व्हिसाची देवाणघेवाण गेल्या वर्षी 1 ऑगस्टपासून सुरु झाली. यावर्षीच रशिया आणि इराण यांच्यात एक करार झाला आहे. मंत्री म्हणाले की, यामुळे पर्यटन सहकार्याचे नवे पर्व सुरु झाले आहे.

जग कोरोना महामारीच्या छायेतून बाहेर येत असताना, मोफत व्हिसासारखे उपक्रम कोरोनाच्या तडाख्यातून सावरु न शकलेल्या पर्यटन उद्योगाला आशेचा किरण देत आहे. तज्ञांच्या मते, देशांमधील असे करार सांस्कृतिक आणि आर्थिक विकासाला चालना देतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

Pandharpur Wari: गोव्यातून पंढरपूरला जाऊन यायला दीड महिना लागायचा, परतल्यावर गावातील लोक भजन करीत त्यांना घरी न्यायचे

Ivory Suggling Khanapur: खानापूरमध्ये गुन्हे शाखेची मोठी कारवाई, हस्तिदंत तस्करी करणाऱ्या रॅकेटचा केला पर्दाफाश; 7 हस्तिदंतांसह तिघांना अटक

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Gopal Khemka Murder: बिहार हादरले, गोळ्या घालून प्रसिद्ध उद्योगपती गोपाल खेमका यांची हत्या

SCROLL FOR NEXT