Britain's Home Minister Suella Braverman Dainik Gomantak
ग्लोबल

Britain: सुएला ब्रेव्हरमन यांना मंत्रिमंडळात स्थान दिल्याने वाद; विरोधक आक्रमक

सुनक यांचा हा निर्णय चुकीचा असल्याचे विरोधकांनी म्हटले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

ब्रिटनच्या पंतप्रधानपदाची (Britain PM) सुत्रे हाती घेतलेल्या ऋषी सुनक (Rushi Sunak) यांनी सुएला ब्रेव्हरमन (Suella Braverman) यांच्याकडे पुन्हा गृहमंत्रीपदाची जबाबदारी सोपवली आहे. मात्र सुएला यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान दिल्याने सुनक यांच्यावर दबाव वाढत आहे. यावरून विरोधक देखील आक्रमक झाले असून, सुनक यांचा हा निर्णय चुकीचा असल्याचे विरोधकांनी म्हटले आहे.

लिझ ट्रस (Liz Truss) यांच्या सरकारमध्ये मंत्री असणाऱ्या सुएला यांनी देखील गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. विरोधी पक्षनेते आणि कामगार खासदार यवेट कूपर यांनी रविवारी सुनक यांनी घेतलेल्या निर्णयाबद्दल सुनक यांना फटकारले. पंतप्रधानांचा हा निर्णय पुन्हा देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोकादायक ठरू शकतो, असे कूपर यांनी म्हटले आहे. सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या मंत्र्याची पुन्हा नियुक्ती करून अत्यंत वाईट निर्णय घेतला आहे. असे यवेट कूपर म्हणाले.

राष्ट्रीय सुरक्षा देखील महत्त्वाची आहे आणि त्याकडे दुर्लक्ष केले जाऊ नये. ब्रेव्हरमनने त्याच्या वैयक्तिक ईमेलवरून सुरक्षित माहिती पाठवून संहितेचा भंग करत आहेत. असेही यवेट कूपर म्हणाले आहेत. दरम्यान, सुनक यांनी सुएला यांचा बचाव करत, त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात स्थान देण्याचा निर्णय अचूक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच, मंत्रिमंडळातील सुएला एक अत्यंत महत्वाच्या साथिदार आहेत असेही सुनक यांनी सुएला यांच्या बचावात बोलताना म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

INDIA Alliance Protest: संसद परिसरात हायव्होल्टेज ड्रामा, राहुल गांधी, संजय राऊतांना पोलिसांनी घेतलं ताब्यात; इंडिया आघाडीचा मोर्चा अडवला

Goa Crime: बारमध्ये वाद, पोलिसांशी अरेरावी,डिचोलीत मध्यरात्री हाय व्होल्टेज ड्रामा; तिघांना अटक

Goa Tourism: ..ज्या चुका पूर्वी वायनाड, उत्तरकाशीने केल्या; तसेच परिणाम गोव्यालाही भोगावे लागतील का?

Goa Live News: राहुल गांधींना अटक!

Bison In Ponda: बोणबाग- बेतोडामध्ये भरवस्तीत गवा रेड्यांचा मोकाट वावर, परिसरात भीतीचं वातावरण Watch Video

SCROLL FOR NEXT