सुशेगाद पात्रांव: देवा प्रसादाची आज्ञा करा!

जनतेचा विश्वास सार्थ ठरवणे सहजशक्य नसतं परमेश्वरा, तुम्ही जाणता!
Sushegad Patrav
Sushegad PatravDainik Gomantak

सुशेगाद पात्रांव

पात्रांव करामतरावांची कैफियत घेऊन मंदीरात पोहचला आहे. 'ईश्वरी आज्ञेचा आदर केला, जंगजंग पछाडून 'विलना'चे दिव्य पार पडले. काटेरी शब्दांचे क्षीर झेलले, पुन्हा नव्यानं एकनिष्ठेची शपथ घेतली. भेटीगाठीने मर्जी मिळवली तरीही 'प्रसादा'साठी एवढी उपेक्षा माझ्याच वाट्याला का?' एवढ्या माफक प्रश्नावर पात्रांव देवाशी झगडा घालतोय...

पात्रांव देवापुढे नतमस्तक झालायं...

देवा तुमचं काहीतरी चुकतयं? तुमच्या आज्ञेचा नेहमीच आदर करणाऱ्या, तुमच्याच आशिर्वादानं 'वेळोवेळी' एकनिष्ठेची शपथ घेणाऱ्या 'दृष्ट्या' नेत्याला ही उपेक्षा भोगावी लागतेय हे मला अमान्य आहे. देवा विलनाचे दिव्य केवढं भव्य होतं. त्याला लागणारा संयम, वेळ आणि बेरजेचं गणीत करताना केवढी दमछाक झाली. आणि विश्वास जिवंत ठेवण्याची रिस्क त्यांनी पत्कारली आहे. त्याची किंमत (राजकीय) त्या लाभार्थ्याला मिळायला नको? बोला देवा.. उत्तर द्या..

Sushegad Patrav
सुशेगाद पात्रांव: कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे...!

पात्रांव जोडलेल्या हातांनी देवापुढे गुडघे टेकतो

देवा राज्यानं करामतरावांच नेतृत्व पाहिलयं, कतृत्व पाहिलयं आणि म्हणूनच मायबाप जनतेनं पुन्हा विश्वास ठेवला. उगाच नाही लोकशाहीतील सर्वोच्च दान पदरात टाकलं? जनतेचा कौल ठरण्यापूर्वी तुमची आणि त्यांची भेट झालीच होती की. पूर्वापारचे सोबती सर्वच होते 'त्या' एकनिष्ठेच्या शपथविधीला. जनतेचा विश्वास सार्थ ठरवणे सहजशक्य नसतं परमेश्वरा, तुम्ही जाणता!

काहीतरी आठवत पात्राव भावनिक झाला

आता काही निर्णय बदलावे लागतात देवा, पण त्यापूर्वी तुमच्याशी सल्लामसलत केलीच ना. तुमच्या आज्ञेनंतरच त्यांनी 'तो' निर्णय घेतला. आणि विशेष म्हणजे गल्ली ते दिल्ली तुम्हा दोघांचीच चर्चा झाली. आता एवढी प्रसिद्धी कधी नशिबात आली होती का? बरं त्यानंतर मडगावच मैदान मारून दाखवलं की त्यांनी, आणि काय दाखला द्यावा. तुम्ही सांगा.

Sushegad Patrav
Goa News: चोर तो चोर अन् वर शिरजोर? 'खरी कुजबूज'

देवा प्रसादाची आज्ञा करा

राज्याचे प्रमुख विस्तारावर कधी बोलतच नाहीत, बोलले तर काही निष्कर्ष मिळत नाही. काही सध्या विचारात नाही, असेच म्हणतात. देवा मी संभ्रमात आहे. नुकतेच प्रभारी आले गोवा 'चार्ज' करायला. त्यांनी देखील चकार शब्द काढला नाही. उलट आम्हाला मजबूतीचे धडे देऊन गेले. देवा करामतरावांसाठी तुम्ही थोडे कष्ट घ्या... आणि तातडीने प्रसादाची आज्ञा करा......

ता.क: करामतरावांनी मडगावात नगराध्यपदाची खुर्ची मिळवली (हिसकावली) याशिवाय, नुकतेच कमकुवत झालेल्या काँग्रेसला आणखी एक धक्का दिला. नुकतेच मडगावच्या कार्यकर्ता मेळाव्यात काँग्रेसच्या माजी विभाग प्रमुखाने 2,500 हजार समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com