Zombie Deer Disease, Chronic Wasting Disease 
ग्लोबल

Zombie Deer Disease: उत्तर अमेरिकेत पसरला असा रोग ज्यामुळे हरणांना चढत आहे नशा, पाहा Viral Video

Ashutosh Masgaunde

Researchers in America warned about the spread of chronic wasting disease or 'zombie deer disease', which causes the animals to become unconscious and delirious:

उत्तर अमेरिकेत एका नवीन रोगाने धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. आणि हा रोग खूप वेगाने पसरत आहे. याचे नाव क्रॉनिक वेस्टिंग डिसीज (CWD) आहे, परंतु लोक याला झोम्बी डीअर डिसीज असेही म्हणतात. झोम्बी डियर डिसीज हरणांमध्ये अतिशय शांतपणे पसरत आहे.

हरणांमध्ये पसरलेल्या या धोकादायक आजारामुळे शास्त्रज्ञांना काळजी वाटू लागली आहे की, हा झोम्बी डियर रोग मानवांमध्येही पसरू शकतो.

या आजारात न्यूरोलॉजिकल समस्या उद्भवतात. यामुळे हा रोग झालेली हरणे नशेच्या अवस्थेत दिसत असून, ती आळशी होऊन रिकाम्या जागेकडे एकटक पाहत आहेत.

आत्तापर्यंत हा आजार एकट्या वायोमिंगमध्ये 800 हून अधिक हरणांमध्ये आढळला आहे.

शास्त्रज्ञांच्या मते, या रोगामुळे न्यूरोलॉजिकल डिजेनेरेशन होते. म्हणजे मेंदूचा विकास थांबतो. मन निस्तेज होऊ लागते. गोष्टी समजून घेण्याची क्षमता नाहीशी होऊ लागते.

या आजारामुळे होणाऱ्या रोगांची समस्या अशी आहे की, ते वातावरणात शतकानुशतके टिकून राहू शकतात. संधी पाहून ते पुन्हा पसरू लागतात.

या रोगांची आणखी एक समस्या अशी आहे की, फॉर्मल्डिहाइड, रेडिएशन किंवा अत्यंत उच्च किंवा कमी तापमान देखील त्यांना दूर करू शकत नाही.

CWD च्या प्रसाराचा सर्वात मोठा धोका मानव आणि पर्यावरण दोघांनाही आहे. हा रोग थेट मानवांना संक्रमित करू शकतो की नाही याचा कोणताही थेट पुरावा सध्या उपलब्ध नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT