Vladimir Putin in love with a woman 32 years younger than him? British newspaper claims:
रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या वैयक्तिक आयुष्यातील किस्से नेहमीच चर्चेत असतात. त्यांच्याबाबतच्या अनेक गोष्टी आजही जगासमोर गूढच आहेत.
दरम्यान, पुतिन हे लंडनमध्ये शिकलेल्या एका महिलेच्या प्रेमात पडल्याचे बोलले जात आहे. ही महिला पुतिन यांची समर्थक आणि युक्रेनविरोधी सिनेटरची मुलगी असल्याचे सांगितले जाते. एका आघाडीच्या ब्रिटीश वृत्तपत्राने युक्रेनच्या मीडियाच्या हवाल्याने हा दावा केला आहे.
ही महिला इंटरनेटवर पुतिन यांच्याविरुद्धच्या गोष्टी सेन्सॉर करते. मोठी गोष्ट म्हणजे ही महिला पुतिन यांच्यापेक्षा 32 वर्षांनी लहान आहे. तिचे नाव एकटेरिना कात्या मिझुलिना आहे. ती रशियाच्या सेफ इंटरनेट लीगची प्रमुख आहे.
वृत्तपत्राने आपल्या बातमीत म्हटले आहे की, या महिलेने इंटरनेटवर अशा गोष्टींवर बंदी घातली आहे ज्यामुळे रशियाच्या राष्ट्राध्यक्षांची प्रतिमा खराब होऊ शकते.
युक्रेनियन मीडियानुसार, रशियन स्त्रोतांचा हवाला देऊन, असा दावा केला जात आहे की एकटेरिना कात्या मिझुलिना यांचे रूप पुतिन यांना आकर्षित करते.
कात्या यांनी 2004 मध्ये लंडन विद्यापीठाच्या स्कूल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीजमधून पदवी प्राप्त केली आहे. त्यांच्याकडे कला, इतिहास आणि इंडोनेशियन भाषेतील पदवी आहेत. चीनला भेट देणाऱ्या अधिकृत रशियन शिष्टमंडळातही त्या अनुवादक होती.
यापूर्वी रशियाच्या माजी ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या अलिना काबाएवासोबतही पुतिन यांचे नाव जोडले गेले आहे.
माहितीनुसार, कबेबा आणि पुतिन बरेच दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये होते. या काळात त्यांना तीन मुलेही झाली. मात्र, पुतिन यांच्या बाजूने या वृत्तावर कोणतेही स्पष्टीकरण आलेले नाही.
या यादीत पुतिन यांच्या माजी पत्नी ल्युडमिला पुतिन यांचेही नाव आहे. ल्युडमिला फ्लाइट अटेंडंट होत्या. पुतिन यांनी 1983 मध्ये त्यांच्याशी लग्न केले होते. हे नाते 2014 पर्यंत टिकले.
रशियन पत्रकार आणि कैद्यांचे हक्क कार्यकर्ते ओल्गा रोमानोव्हा यांनी एका युक्रेनियन वृत्तवाहिनीला सांगितले की, पुतिन यांचे सर्वात मोठे विरोधक मानले जाणारे दिवंगत अलेक्सी नवलनी यांनी सुरुवातीला व्लादिमीर पुतिन आणि एकतेरिना कात्या मिझुलिना यांच्यातील संबंध उघड केले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.