श्रीलंकेच्या राष्ट्रपतींनी गुरुवारी ज्येष्ठ नेते रानिल विक्रमसिंघे यांना नवे पंतप्रधान म्हणून शपथ दिली. रानिल विक्रमसिंघे यांच्या युनायटेड नॅशनल पार्टीला (UNP) श्रीलंकेच्या 225 सदस्यीय संसदेत फक्त एक जागा आहे. विक्रमसिंघे (Ranil Wickremesinghe) यांना ऑक्टोबर 2018 मध्ये तत्कालीन राष्ट्राध्यक्ष मैत्रीपाला सिरिसेना यांनी पंतप्रधान पदावरुन हटवले होते. मात्र, दोनच महिन्यांनंतर सिरिसेना यांनी त्यांना या पदावर बहाल केले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंतरिम प्रशासनाचे नेतृत्व करण्यासाठी विक्रमसिंघे यांना सर्व पक्षांचा पाठिंबा आहे. त्यांची नियुक्ती 6 महिन्यांसाठी करण्यात आली आहे. विक्रमसिंघे यांनी नवे पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्यानंतर बहुमत मिळेल, असा विश्वास UNP अध्यक्ष व्ही अबेवर्देना यांनी व्यक्त केला आहे. देशातील सर्वात जुना पक्ष UNP 2020 मध्ये एकही जागा जिंकू शकला नाही. विक्रमसिंघे यांनीही निवडणूक लढवली होती, परंतु यूएनपीचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कोलंबोमध्ये त्यांचा पराभव झाला. त्यानंतर विक्रमसिंघे यांचे सहकारी सजिथ प्रेमदासा यांनी त्यांच्यापासून फारकत घेत SJB पक्ष स्थापन केला. जो नंतर मुख्य विरोधी पक्ष बनला.
दरम्यान, विक्रमसिंघे हे दूरदर्शी धोरणांसह अर्थव्यवस्था (Economy) हाताळणारे नेते म्हणून ओळखले जातात. आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा श्रीलंकेला (Sri Lanka) स्थापित करण्यासाठी विक्रमसिंघे प्रयत्न करतील असेही म्हटले जात आहे. राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी बुधवारी उशिरा राष्ट्राला संबोधित करताना या आठवड्यात नवीन पंतप्रधान आणि युवा मंत्रिमंडळ स्थापन करणार असल्याचे म्हटले होते.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.