Queen Elizabeth II Dainik Gomantak
ग्लोबल

राणी एलिझाबेथला तुरुंगात टाकले जाऊ शकते? जाणून घ्या

राणी एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth II) यांना ब्रिटनच्या संविधानानुसार 'विशेषाधिकार' देण्यात आला आहे, हे सर्वांनी माहिती असणे आवश्यक आहे.

दैनिक गोमन्तक

ब्रिटनचे प्रिन्स अँड्र्यू यांच्या प्रकरणी कायदेशीर कारवाई सुरु आहे. अशा स्थितीत ब्रिटिश राजघराण्यातील सदस्य तुरुंगात जाऊ शकतो का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. या प्रश्नाचे उत्तर होय असे आहे. दोषी ठरल्यास ते तुरुंगात जाऊ शकतात. मात्र, राणी एलिझाबेथ द्वितीय (Britain Queen Elizabeth II) यांना ब्रिटनच्या (Britain) संविधानानुसार 'विशेषाधिकार' देण्यात आला आहे, हे सर्वांनी माहिती असणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत त्या कोणत्याही प्रकारची कायदेशीर चूक करु शकत नाही. यामुळे त्यांच्यावर इंग्लंडच्या संविधानानुसार दिवाणी किंवा फौजदारी कारवाई होत नाही. अशा परिस्थितीत जाणून घेऊया राजघराण्यातील सदस्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली. (Queen Elizabeth II Is Not Subject To Civil Or Criminal Proceedings Under The British Constitution)

प्रिन्स अँड्र्यू: राणी एलिझाबेथ II चा दुसरा मुलगा Prince Andrew यूएसमध्ये लैंगिक अत्याचाराच्या खटल्याला सामोरे जात आहे. अलीकडेच एका अमेरिकन न्यायमूर्तींनी त्यांच्याविरुद्ध दाखल केलेला खटला रद्द करण्याची याचिका फेटाळून लावली.

प्रिन्सेस अ‍ॅन: 2002 मध्ये, राणी एलिझाबेथ II ची एकुलती एक मुलगी प्रिन्सेस अ‍ॅन डेंजरस डॉग्स एक्ट अंतर्गत दोषी आढळली आहे. अशा प्रकारे गुन्ह्यासाठी दोषी ठरलेली ती सध्याच्या राजघराण्यातील पहिली सदस्य ठरली आहे. विंडसर ग्रेट पार्कमध्ये त्यांच्या एका पाळीव कुत्र्याने दोन मुलांचा चावा घेतला होता.

प्रिन्स फिलिप: 2019 मध्ये, प्रिन्स फिलिप, राणी एलिझाबेथ II यांचे पती, एका कार अपघातात सामील होते. या अपघातात एका महिलेचे मनगट तुटले. मात्र, त्यांच्यावर कोणतेही आरोप झाले नाहीत. खरंतर, त्यांच्याविरुद्धचा दाखल करण्यात आलेल्या खटल्याचा तपासही बंद करण्यात आला होता, कारण दिवंगत ड्यूकने त्यांचा ड्रायव्हिंग लायसन्स दिले होते.

झारा टिंडल: 2020 मध्ये, प्रिन्सेस अ‍ॅनची मुलगी झारा टिंडलला भरधाव कार चालवल्याबद्दल दोषी आढळल्यानंतर तिला सहा महिन्यांसाठी ड्रायव्हिंग करण्यास बंदी घालण्यात आली होती.

राजा चार्ल्स पहिला: काही वर्षांपूर्वी देशात कोणत्याही प्रकारची न्यायव्यवस्था अस्तित्वात नव्हती. त्या काळात राजा चार्ल्स पहिला यांच्यावर अत्याचार आणि देशद्रोहाचे आरोप झाले होते. इंग्लिश गृहयुद्ध संपल्यानंतर 20 जानेवारी 1649 रोजी त्याला वेस्टमिन्स्टर हॉलमध्ये खटल्यासाठी आणण्यात आले. त्याच वर्षी 26 जानेवारी रोजी त्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. त्यानंतर चार दिवसांनी लंडनच्या व्हाईटहॉलमधील बँक्वेटिंग हाऊसच्या बाहेर त्यांचा शिरच्छेद करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Disneyland In India: भारतात होणार ‘डिस्नेलँड’, 500 एकर परिसरातल्या थीम पार्कला ‘या’ राज्याने दिली मंजुरी

Crocodiles Viral Video: हा कसला वेडेपणा! चक्क मगरीला दुचाकीवर घेऊन प्रवास, व्हिडिओ पाहून म्हणाल, खतरनाक...

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Goa News Live Updates: पर्ये मॅनेजमेंट कॉलेज जवळ रात्री चाकू हल्ला

SCROLL FOR NEXT