'ह्युमन-चिंपांझी' चे क्रॉस-ब्रीडिंग करुन चीन बनवतोय 'सुपरमॅन'

1980 च्या दशकात, एका अहवालातून समोर आले की, चीनने (China) 1967 मध्ये 'ह्यूमन-चिंपांझी'चे क्रॉस-प्रजनन करुन एक महामानव निर्माण केला होता.
chimpanzee

chimpanzee

Dainik Gomantak 

Published on
Updated on

मानव आणि इतर प्राण्यांमध्ये हाइब्रिड (Hybrid) निर्माण झाल्याच्या बातम्या अनेकदा समोर येतात. यावेळी चीनमधून ही बातमी समोर आली आहे. 1980 च्या दशकात, एका अहवालातून समोर आले की, चीनने 1967 मध्ये 'ह्यूमन-चिंपांझी'चे क्रॉस-प्रजनन करुन एक महामानव निर्माण केला होता. त्याचवेळी आता चीन (China) सरकार हा प्रोजेक्ट पुन्हा सुरु करत आहे. या प्रोजेक्टशी निगडित शास्त्रज्ञ डॉ. जी योंग्‍यांग यांनी वेन हुई बोआ यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले की, चिंपांझीची (chimpanzee) अविश्वसनीय ताकद राखून बोलू शकणारा प्राणी तयार करणे हे आमचे ध्येय आहे.

दरम्यान, डॉ जी योंग्झियांग म्हणाले की, संकरित 'ह्युमनॉइड्स' चा (मानव आणि माकडांचे संयोजन) खाणकाम, कृषी कार्य, बाह्य अवकाश आणि महासागराच्या खोलीसारख्या धोकादायक वातावरणाचा शोध घेण्यासाठी वापर केला जाईल. आतापर्यंत असा महामानव तयार केल्याचा कोणताही यशस्वी पुरावा सापडलेला नाही. पण अमेरिकेतील संकरीकरण प्रोजेक्टदरम्यान मानवाचा जन्म झाल्याचा दावा 'द सन' मधील एका अहवालात करण्यात आला आहे. मात्र त्यानंतर लॅबच्या कर्मचाऱ्यांनीच त्याची जाणीवपूर्वक हत्या केली. मात्र, आता चीनमध्ये असे काम पुन्हा सुरु करण्यात आले आहे.

<div class="paragraphs"><p>chimpanzee </p></div>
अमेरिकन लष्करी 'न्यायव्यवस्थेत' होणार सुधारणा

अवयवांसाठी 'माणूस' तयार करण्यासाठी केलेले प्रयत्न

मानव आणि इतर प्राण्यांमध्ये हाइब्रिड (Hybrid) निर्माण करण्यासाठी गेल्या 100 वर्षांपासून प्रयत्न केले जात आहेत. प्राण्यांना मानवासारखे बनवणे हा त्याचा उद्देश आहे. या कल्पनेमागील खरा हेतू हा आहे की या संकरातून अवयव मिळवता येतात. हे प्रयत्न अजूनही सुरू आहेत. 2019 मध्ये, यूएस साल्क इन्स्टिट्यूट फॉर बायोलॉजिकल स्टडीजचे प्रोफेसर जुआन कार्लोस इझपिसुआ बेलमॉन्टे यांच्या नेतृत्वाखालील शास्त्रज्ञांच्या चमूने 19 दिवस जगणारे 'मानव-माकड संकर' (Human-monkey hybrid) तयार केले.

<div class="paragraphs"><p>chimpanzee </p></div>
2022 साली कोरोनापेक्षाही धोकादायक विषाणू येणार; बाबा वंगांची भविष्यवाणी

रशियातही असाच प्रयत्न झाला

त्याच वेळी, 1920 च्या दशकात, रशियातील सोव्हिएत शास्त्रज्ञांना हुकूमशहा स्टॅलिनने एक संकरित वानर-मानव, म्हणजेच 'सुपर सोल्जर' तयार करण्याचे आदेश दिले होते. हा सुपर सैनिक सामान्य माणसांसाठी धोकादायक समजल्या जाणाऱ्या परिस्थितीतही काम करण्यास सक्षम असावा. जेव्हा 1990 मध्ये गुप्तचर दस्तऐवजांचे वर्गीकरण करण्यात आले तेव्हा असे उघड झाले की क्रेमलिनच्या प्रमुखाला संकरित एप-मॅनची फौज हवी होती. त्यांची इच्छा अशी होती की हे सैन्य खूप सामर्थ्यवान असावे, ज्याला मेंदू देखील असेल, परंतु त्यांना भूक वाटू नये. या प्रकल्पाचे नेतृत्व इल्या इव्हानोविच इवानोव यांनी केले.

1970 च्या दशकात सापडलेल्या 'ह्युमॅनीज' बद्दल माहिती

इल्या इव्हानोविच इव्हानोव्ह हे एक शास्त्रज्ञ म्हणून ओळखले जातात ज्यांचे संपूर्ण आयुष्य मानव आणि माकडांमध्ये क्रॉस-प्रजनन करण्यात घालवले गेले आहे. त्याच वेळी, संकरित एप-मॅन तयार करण्याचा प्रकल्प यशस्वी झाला नाही. इव्हानोव्हचा 1930 मध्ये सोव्हिएत छावणीत मृत्यू झाला. त्याच वेळी, 1970 च्या दशकात, उत्परिवर्ती चिंपांझीची चर्चा होती. ऑलिव्हर नावाचा चिंपांझी 'मानव-चिंपांझी संकरित' असल्याची नोंद होती. तो इतर चिंपांझींपेक्षा जास्त हुशार आणि कमी केसाळ होता. परंतु त्याचे पोस्टमॉर्टम केले असता त्याच्या शरीरात सामान्य चिंपांझीसारखेच अवयव असल्याचे आढळून आले. त्यामुळे हा प्रोजेक्ट फसला होता..

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com