जासूसी करण्याचा चीनचा बिग प्लॅन! उपग्रहांच्या माध्यमातून बनवतोय ‘मेगाकॉन्स्टेलेशन’

चीनने जगामध्ये जासूसीसंबंधी भीती निर्माण केली आहे. वास्तविक, पृथ्वीच्या खालच्या कक्षेत 13,000 उपग्रहांद्वारे 'मेगाकॉस्टेलेशन' (Megaconstellation) तयार करण्याची चीनची योजना आहे.
Megaconstellation
MegaconstellationDainik Gomantak

चीनने जगामध्ये जासूसीसंबंधी भीती निर्माण केली आहे. वास्तविक, पृथ्वीच्या खालच्या कक्षेत 13,000 उपग्रहांद्वारे 'मेगाकॉस्टेलेशन' (Megaconstellation) तयार करण्याची चीनची योजना आहे. हे नेटवर्क चीनच्या (China) चायनीज 5G मोबाईल इंटरनेट एक्स्टेंशन Canare चा भाग असल्याचे म्हटले जात आहे. 5G तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी काही कंपन्यांना चोंगकिंग शहरात कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले आहे.

त्याच वेळी, या नेटवर्कद्वारे कशाचा समावेश करण्यात येईल यासंबंधी मात्र संदिग्धता आहे. याशिवाय ते कसे काम करणार याबाबत कोणतीही माहिती नाही. परंतु त्याचे लक्ष्य कम्युनिकेशन (Communication) आणि ग्रामीण भागातील गरजा पूर्ण करणे हे ठेवण्यात आले आहे. सध्या चीनच्या या योजनेमुळे जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Megaconstellation
5G हवेत उडणारे विमान खाली आणू शकते का?

दरम्यान, अंतराळासंबंधी चीनने उचललेले कोणतेही पाऊल सुरक्षा तज्ज्ञांमध्ये चिंता निर्माण करत आहे. इंटरनेटसह उपग्रहांचा समूह असणे हा चीन सरकारसाठी उच्च-स्तरीय प्रकल्प मानला जातो. याच्या मदतीने केवळ चीनमध्येच नव्हे तर जगभरात कम्युनिकेशनची सेवा दिली जाऊ शकते. याद्वारे चीन पाश्चिमात्य देशांच्या ऑपरेटर्सना मागे टाकणार आहे. हजारो उपग्रहांपासून एक मेगाकॉस्टेलेशन बनविण्यात येतो. जो पृथ्वीच्या सर्व क्षेत्रांना कव्हर करण्यासाठी एकत्रितपणे कार्य करतो. तसेच हा उपग्रह इंटरनेट सेवा प्रदान करण्यासाठी ग्रहाच्या पृष्ठभागापासून काहीशे मैलांवर कार्यरत असतो.

तसेच, सध्या चीन आणि पश्चिमी देशातील राजनयिक संबंधांमध्ये स्थिरता आली आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे कोरोना महामारी. अशा परिस्थितीत उपग्रहांचे मोठ्या प्रमाणावर प्रक्षेपण केल्याने भीती निर्माण होत आहे. कारण त्यांचा वापर अमेरिका आणि त्याच्या मित्र राष्ट्रांविरुद्ध हेरगिरी करण्यासाठी होऊ शकतो.

Megaconstellation
विमान हवेत असताना तो अचानक उठला आणि ओरडला..'विमानात दहशतवादी आहे'...

शिवाय, चीनच्या नव्या योजनेअंतर्गत चोंगकिंगमध्ये एक नवीन कम्युनिकेशन बेस बांधला जाणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com