Queen Elizabeth II
Queen Elizabeth II Dainik Gomantak
ग्लोबल

Queen Elizabeth II यांनी भारतातील 'या' घटनेला मानली होती ब्रिटीशांची चूक

दैनिक गोमन्तक

Queen Elizabeth II Death: राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे गुरुवारी वयाच्या 96 व्या वर्षी निधन झाले. त्यांनी 70 वर्षे राज्य केले. ब्रिटिश इतिहासात सर्वात जास्त काळ राज्य करणाऱ्या त्या राणी ठरल्या. बकिंघहॅम पॅलेसने 10 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करुन त्यांच्या निधनाची घोषणा केली होती. बालमोरल येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तत्पूर्वी, गुरुवारीच डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यांनी राणी एलिझाबेथ यांना वैद्यकीय देखरेखीखाली राहण्याचा सल्ला दिला होता.

दरम्यान, राणी एलिझाबेथ द्वितीय गेल्या ऑक्टोबरपासून खूप आजारी होत्या. त्यांना ना चालता येत होतं ना उभं राहता येत होतं. आजारपणामुळे त्यांनी अलीकडच्या काळात प्रवासही टाळला होता. चार्ल्स, प्रिन्स ऑफ वेल्स त्यांच्या पश्चात राजा होतील. राणी एलिझाबेथ द्वितीय यांनी आपल्या कार्यकाळात तीन वेळा भारताला भेट दिली होती. 1961, 1983 आणि 1997 मध्ये त्या भारत दौऱ्यावर आल्या होत्या. त्यांच्या भारतातील तीन दौऱ्यांवर एक नजर टाकूया...

1961: भारताच्या स्वातंत्र्यानंतर सुमारे 15 वर्षांनी त्यांची भारत भेट सर्वात संस्मरणीय ठरली होती. स्वातंत्र्यानंतर ब्रिटिश राजाची ही पहिलीच भारत भेट होती. राणी एलिझाबेथने 1961 मध्ये पती ड्यूक ऑफ एडिनबर्ग आणि प्रिन्स फिलिपसह दिल्लीला आले होते. शाही जोडप्याचे विमानतळावर तत्कालीन राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद आणि पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांनी स्वागत केले होते. या दौऱ्यात राणींनी राजघाटालाही भेट दिली होती. महात्मा गांधींच्या स्मृतीस त्यांनी पुष्पहार अर्पण केले होते.

दरम्यान, राणी आणि त्यांच्या पतीने महात्मा गांधींना आदरांजली वाहण्यासाठी स्मारक परिसरात प्रवेश करण्यापूर्वी बूट काढले होते. त्यांनी त्यावेळी मखमली चप्पल घातली होती. 27 जानेवारी रोजी तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या उपस्थितीत आयोजित एका भव्य समारंभात त्यांनी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) च्या इमारतींचे उद्घाटन केले होते. यानंतर त्यांनी मुंबई, चेन्नई आणि कोलकाता येथेही भेट दिली होती. आग्र्याचा ताजमहालही त्यांनी पाहिला होता. दौऱ्यादरम्यान त्या कुठेही गेल्या तरी त्यांची एक झलक पाहण्यासाठी लोक तोबा गर्दी करत होता.

1983: राणी एलिझाबेथ II आणि प्रिन्स फिलिप यांनी 1983 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती ग्यानी झैल सिंग यांच्या निमंत्रणावरुन भारताला भेट दिली होती. राणी आणि त्यांचे पती राष्ट्रपती भवनाच्या नवीन विंगमध्ये वास्तव्यास होते. राष्ट्रकुल प्रमुखांच्या बैठकीत त्या सहभागीही झाल्या होत्या. या भेटीदरम्यान, राणींनी विशेषत: मदर तेरेसा यांना ऑर्डर ऑफ मेरिट पुरस्काराने सन्मानित केले होते. भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचीही त्यांनी भेट घेतली होती.

1997: राणी एलिझाबेथ द्वितीय 1997 मध्ये तिसऱ्या आणि शेवटच्या भारत दौऱ्यावर आल्या होत्या. तेव्हा भारताच्या स्वातंत्र्याला 50 वर्षे पूर्ण होत होती. राणी आणि पती प्रिन्स फिलिप यांनी भारताचे तत्कालीन राष्ट्रपती के. आर. नारायणन आणि पंतप्रधान इंदर कुमार गुजराल यांची भेट घेतली होती. त्यांनी पुन्हा एकदा राजघाटावर महात्मा गांधींना आदरांजली वाहिली होती. राणींनी अमृतसरमधील जालियनवाला बाग स्मारकालाही भेट दिली होती. त्यादरम्यान त्यांनी जालियनवाला बागला दुःखद घटना म्हटले होते. हे सांगताना त्यांनी मान झुकवली होती.

शेवटी, एलिझाबेथ द्वितीय यांनी भारताच्या तीन राष्ट्रपतींचेही स्वागत केले होते. त्यांनी 1963 मध्ये डॉ. के.आर. नारायणन, 1990 मध्ये आर. वेंकटरामन आणि 2009 मध्ये प्रतिभा पाटील यांचे स्वागत केले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News: सहा लाखांचा माल जळून खाक; मोलेत बर्निंग ट्रकचा थरार

Margao News : मतदानाला प्रेरित करण्‍यास पॅरा ग्‍लायडर्सचा वापर : आश्‍वीन चंद्रू

Heavy Rainfall in Brazil: ब्राझीलमध्ये पावसाचा कहर, दक्षिणेकडील राज्यात 10 जणांचा मृत्यू; राज्यपालांनी दिला आपत्तीचा इशारा

Goa Loksabha Election: ‘सायलंट’ मतदार दाखवणार करिष्मा; फोंड्यात ‘गोमन्तक-टीव्ही’ महाचर्चा

Margao District Hospitals : जिल्हा रुग्णालयाचे खासगीकरण रद्द करणार : विरियातोंचे आश्वासन

SCROLL FOR NEXT