ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचे वयाच्या 96 व्या वर्षी स्कॉटलंडमधील बालमोरल पॅलेस येथे निधन झाले. जगभरातून त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला जात आहे. तसेच ब्रिटनमध्ये सर्वात जास्त काळ राजगादी संभाळणाऱ्या राणी एलिझाबेथ II (Queen Elizabeth II) यांच्या निधनाबद्दल यूके आणि संपूर्ण कॉमनवेल्थमधील गोवासियांनी शोक व्यक्त केला आहे.
यूके मधील गोवा (Goa) लोकांची सर्वात जुनी संघटना, गोवन असोसिएशन यूकेचे अध्यक्ष रवी वाझ म्हणाले की, राणी एलिझाबेथ-२ आशा आणि ऐक्याचा किरण होत्या. “त्यांच्या कर्तव्याला समर्पित आणि त्यांच्या शेवटच्या दिवसांपर्यंत देशाची सेवा करत असताना, आपल्या आयुष्यात अशा महान नेतृत्वाचा साक्षीदार होण्याचा बहुमान मिळाला आहे. आपल्या सर्वांसाठी हा अत्यंत दुःखाचा दिवस आहे,” "गोवन असोसिएशन यूके आणि यूके मधील गोवा समुदायाच्या वतीने, मी त्यांच्या दु:ख निधनावर शोक व्यक्त करू इच्छितो,"
ते पुढे म्हणाले, नव्याने स्थापन झालेल्या युनायटेड गोअन्स एफिलिएशन युनायटेड किंगडम लिमिटेड (UGA UK) ने देखील राणी एलिझाबेथ II च्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले. “United Goans Affiliation UK Ltd च्या वतीने, आमच्या प्रिय राणीच्या निधनाची बातमी ऐकून आम्हाला खूप दुःख झाले. एक महान स्त्री आणि उच्च पदाशी संबंधित मानवतेचे एक उत्कृष्ट उदाहरण, त्या इतरांच्या गरजा समजून घेण्याची उत्कृष्ट क्षमता असलेली एक महान व्यक्ती होती. तिला कधीच विसरता येणार नाही. राणीच्या आत्म्यास शांती लाभो” यूजीए यूके लिमिटेडचे अध्यक्ष मायकेल बेव्हन डिसिल्वा म्हणाले.
मेरविन मॅसीएल यांनी देखिल राणीच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ते यूके मधील सर्वात ज्येष्ठ गोव्यापैकी एक आहेत. कॅनेडियन गोवावासीयांनी देखील महामहिम एलिझाबेथ II यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला, कारण त्या कॅनडाच्या राजेशाही प्रमुख होत्या.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.