Afghanistan Dainik Gomantak
ग्लोबल

पाकिस्तान तालिबानला घाबरला! ड्युरंड रेषेवर कुंपण घालणं थांबवलं

तालिबानने या मुद्द्यावरून पाकिस्तानला केवळ कडाडून विरोध केला नाही तर पाकिस्तानी लष्कराला पुन्हा असे न करण्याची धमकीही दिली आहे.

दैनिक गोमन्तक

पाकिस्तानने ड्युरंड लाइन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अफगाणिस्तानच्या सीमेवर कुंपण घालण्याचे काम थांबवले आहे. यासह पाकिस्तान सरकारने तालिबान सरकारला शरणागती पत्करली आहे. तालिबानने (Taliban) यापूर्वी अनेकदा पाकिस्तानी (Pakistan) लष्कराच्या सैनिकांना या रेषेवर कुंपण घालण्यापासून रोखले नाही तर त्यांचे सामानही जप्त केले होते. अशी कुंपण घालण्याचा पाकिस्तानला अधिकार नसल्याचे तालिबानने स्पष्ट केले आहे. तालिबान तर म्हणतात की ते नियमांच्या विरुद्ध आहे. (Pakistan Latest News)

आम्ही तुम्हाला सांगतो की, अफगाणिस्तानवर (Afghanistan) ताबा मिळवण्यापूर्वी सुमारे दोन दशके तालिबान येथून कार्यरत होते. मात्र तालिबानच्या अफगाणिस्तानवर ताबा घेतल्यानंतर पाकिस्तान सरकारने या रेषेवर कुंपण घालण्याचा प्रयत्न केला, तो तालिबानने धमकी देऊन थांबवला. अफगाणिस्तानच्या अल अरेबियाच्या वृत्तानुसार, अफगाणिस्तानमध्ये कमकुवत तालिबान सरकार आल्याचा पाकिस्तानचा गैरसमज होता. त्यामुळे याचा फायदा घेत त्यांनी ड्युरंड रेषेवर कुंपण घालण्याचा विचार केला. मात्र आता हा गैरसमज तालिबानने दूर केला आहे.

बातम्यांनुसार, तालिबानने या मुद्द्यावरून पाकिस्तानला केवळ कडाडून विरोध केला नाही तर पाकिस्तानी लष्कराला पुन्हा असे न करण्याची धमकीही दिली आहे. पाकिस्तानने तांत्रिकदृष्ट्या कुंपण घालण्याचे काम थांबवले असल्याचे मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे. जगातील अनेक देशांकडून मानवतेच्या आधारे अफगाणिस्तानला पाठवले जाणारे मदत साहित्य हे त्याचे प्रमुख कारण आहे. सीमेवर कुंपण लावण्यात आल्याने इस्लामाबाद आणि काबूलमधील तणाव वाढला होता.

अफगाण लोकांसाठी ती ड्युरंड लाइन म्हणून ओळखली जाते. 1893 मध्ये अफगाणिस्तानच्या अमीराशी करार करून ब्रिटिश अधिकाऱ्याने ही रेषा निश्चित केली होती. त्या वेळी, पश्तूनिस्तानच्या कल्पनेने पुढे नेलेल्या पश्तून जमातीच्या सीमा निश्चित करणे हा त्याचा एक उद्देश होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vietnam Boat Accident: व्हिएतनाममध्ये मोठी दुर्घटना! 32 भारतीय पर्यटकांना घेऊन जाणारी बोट उलटली; बचावकार्य सुरू

Tivare Village: तिवरे; हिरवाई, शेतीसंस्कृती आणि परंपरा जपणारे शांत गाव

Goa Mining: कावरे खनिज ब्लॉक; सरकारला दिलासा; खंडपीठाच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Goa Crime: कर्नाटक पोलिसांची म्हापशात धडक; चोरीच्या दागिन्यांचा तपास, गोव्यातील व्यवहार 'महत्त्वाचा दुवा'

Viral Post: इंजिनिअरिंग पूर्ण, 500 ठिकाणी नोकरीसाठी अर्ज... पण इंटरव्ह्यूसाठी एकही कॉल नाही; तरुणाची पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT