Geneva Dainik Gomantak
ग्लोबल

VIDEO: जिनिव्हातील UN ह्यूमन राइट्स ऑफिसबाहेर भारताविरोधात प्रोपगंडा !

Geneva: जिनिव्हा येथील संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या मुख्यालयाजवळ भारताविरोधातील अजेंडा पसरवला जात आहे.

Manish Jadhav

United Nations Human Rights Council: पुन्हा एकदा भारताची बदनामी करण्याचे षडयंत्र परदेशात रचले जात आहे का? भारताविरुद्ध मोहीम चालवण्यासाठी नवीन टूल किट कार्यान्वित करण्यात आली आहे? एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हे प्रश्न उपस्थित होत आहे.

जिनिव्हा येथील संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेच्या मुख्यालयाजवळ भारताविरोधातील अजेंडा प्रसारित जात आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रस्त्याच्या कडेला अनेक पोस्टर्स आणि बॅनर लावण्यात आल्याचे दिसत आहे. या पोस्टर्सवर भारतविरोधी मजकूर आणि घोषणा लिहिलेल्या आहेत.

दरम्यान, हा व्हिडिओ तिथे राहणाऱ्या एका भारतीय विद्यार्थ्याने बनवला आहे. व्हिडीओमध्ये दिसणाऱ्या पोस्टरमध्ये भारतातील (India) महिलांना गुलामांसारखी वागणूक दिली जाते. तिथे इतर पोस्टर्सवर लिहिले आहे की, भारतात बालविवाह होत आहेत, त्यामुळे भारतात मुलांच्या हक्कांचे उल्लंघन होत आहे.

याशिवाय, भारत ख्रिश्चनांच्या विरोधात राज्य समर्थित दहशतवादाचा सामना करत असल्याचे पोस्टरवर लिहिले आहे. दुसऱ्या एका पोस्टरवर भारतातील अल्पसंख्याकांना मॉब लिंचिंगने मारले जात असल्याचे लिहिले आहे.

टूलकिट गॅंग पुन्हा सक्रिय?

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोक सोशल मीडियावर (Social Media) प्रश्न विचारत आहेत की, पुन्हा एकदा भारताची बदनामी करण्याचे षडयंत्र रचले जात आहे का? भारताची बदनामी करण्यासाठी पुन्हा कोणते टूलकिट सक्रिय झाले आहे का? की आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी हे काही नवीन षडयंत्र आहे?

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT