Viral News: आजच्या आधुनिक युगात सोशल मिडियाचा वापर अधिक वाढत चालला आहे. अनेक लोक आपले मत, विचार, एकादी घडलेली घटना सोशल मिडियावर शेअर करत असतात.
अलिकडेच अमेरिकेमधील शिक्षकाचे एक ट्विट सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. तुम्हालाही ते ट्विट वाचून हसू अनावर होइल.
अमेरिकेमधील एक शिक्षक 40 विद्यार्थी असलेल्या वर्गात शिकवण्यास गेले होते. पण जेव्हा ते वर्गात गेले तर एकही विद्यार्थी तेथे हजर नव्हता. नंतर शिक्षकाणे त्या सर्व विद्यार्थ्यांना मेल पाठवला आणि हजर नसण्याचे कारण विचारले.
तुम्हालाही याचे कारण जाणून घेण्याची खुप इच्छा असेल ना! ही संपुर्ण घटना शिक्षक जोसेफ यांनी ट्विट (Tweet) करत शेअर केली आहे. त्यांनी लिहिले की ते शिकवण्यासाठी ज्या वर्गात गेले होते तो चुकीचा वर्ग होता.
जोसेफने ट्विटमध्ये लिहिले की, आज सकाळी 8.15 वाजता माझ्या वर्गात 40 विद्यार्थ्यांपैकी कोणाही आले नाही. वर्गात बसून मी सगळ्यांना मेल केले आणि न येण्याचे कारण विचारले.
2 मिनिटांनंतर मला उत्तर मिळाले की सर, आम्हाला वाटते की तुम्ही स्वतः चुकीच्या वर्गात आहात. म्हणजे स्वतः प्राध्यापकच चुकीच्या खोलीत बसून विचार करत होते की विद्यार्थी का आले नाहीत?
पुढच्या ट्विटमध्ये त्यांनी सांगितले की, त्या दिवशी ते पहाटे 4 वाजता आपल्या मित्रांसोबत गेम खेळण्यासाठी उठले होते आणि त्यामुळे त्यांची पुर्ण झोप झाली नव्हती.
हे ट्विट सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल झाले आहे. त्याला 40 हजारांहून अधिक रिट्विट्स आणि 6 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. या घटनेवर लोक खूप हसत आहेत. लोकांनी कमेंटमध्ये लिहिले की असे कधी ना कधी सगळ्यांसोबत होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.