Prime Minister Antonio Costa Dainik Gomanatk
ग्लोबल

पोर्तुगालमध्ये 'या' भारतीय वंशाच्या पंतप्रधानांना बहुमत

पोर्तुगालमध्ये सुरुवातीला निवडणुकीत सोशालिस्ट पक्षाला पूर्णपणे बहुमत मिळाले आहे. या निकालामुळे पंतप्रधान अँटोनियो कोस्टा यांचे बहुमतात सरकार आले आहे.

दैनिक गोमन्तक

पोर्तुगालमध्ये झालेल्या निवडणुकीत सोशालिस्ट पक्षाला पूर्णपणे बहुमत मिळाले आहे. पोर्तुगालमधील मागील दोन सरकारे ही डाव्या पक्षांच्या पाठिंब्यावर चालत होती, जी या वेळेस उजव्या विचारसरणीच्या पक्षांकडे गेली. तर अतिउजव्या पक्षांनाही यात आघाडी मिळाली आहे. या निकालामुळे पंतप्रधान अँटोनियो कोस्टा (Prime Minister Antonio Costa) यांचे सरकार हे बहुमतात आले आहे.

230 जागांच्या संसदेत समाजवादी पक्षाला 117 जागा मिळाल्या आहेत. गेल्या निवडणुकीत त्यांना 36.3 टक्के मतांसह 108 जागा मिळाल्या होत्या. निवडणुकीपूर्वी, समाजवादी पक्षाला मुख्य विरोधी पक्ष, केंद्रीय उजव्या विचारसरणीच्या सोशल डेमोक्रॅटिक पार्टी (PSD) कडून कडवी स्पर्धा अपेक्षित होती. निवडणुकीत पीएसडीला 27.8 टक्के मतांसह 71 जागा मिळाल्या आहेत. चार जागांवर निकाल येणे बाकी असून, परदेशातून आलेल्या मतांच्या आधारे हा निर्णय होणार आहे. अलिकडच्या वर्षांत ग्रीस आणि फ्रान्स या बदलाचे साक्षीदार आहेत. पण, पोर्तुगालच्या निकालांनी समाजवादी पक्षांचा प्रश्न संपलेला नसल्याचे दाखवून दिले आहे. मात्र, पोर्तुगालच्या अतिउजव्या चेगा पक्षालाही या निवडणुकीत मोठी ताकद मिळाली आहे. गेल्या निवडणुकीत केवळ एक जागा जिंकणाऱ्या चेगाने यावेळी 12 जागा जिंकल्या आहेत. यासह तो जागांच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला.

युरोपमध्ये (Europe) समाजवादाचा ऑक्सिजन?

विजयानंतर जनतेला संबोधित करताना पंतप्रधान कोस्टा म्हणाले, "संपूर्ण बहुमत म्हणजे एकतर्फी सत्ता नाही. म्हणजेच याचा अर्थ असा नाही की हे सरकार एकट्याने चालवले जाईल. तर याचा अर्थ वाढलेली जबाबदारी आणि मी पोर्तुगालच्या सर्व जनतेचे नेतृत्व करीन हा आहे. "पोर्तुगालला अधिक समृद्ध, न्याय्य आणि प्रगतीशील बनवण्यासाठी सर्व गुंतवणूक आणि बदल आवश्यक आहेत.

पीएसडी नेते रुई र्यो यांनी त्यांच्या निवडणूक प्रचारात दावा केला की ते चेगा पक्षाला यावेळी सरकारमध्ये समाविष्ट करणार नाहीत. पण युती सरकारचे नेतृत्व करण्यासाठी ते चेगाचा पाठिंबा घेऊ शकतात, असेही संकेतही त्यांनी दिले आहेत. 64 वर्षीय रिओ यांनी असा दावा केला की अर्थव्यवस्थेचा वेग वाढण्याची गरज आहे आणि त्यासाठी त्यांच्या पक्षाने कॉर्पोरेट कर कमी करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्यांनी सुचविलेल्या उपायांमध्ये खाजगीकरणावरही भर दिला होता.

आर्थिक स्थिती सुधारण्याचे मोठे आव्हान

सध्या देशाची आर्थिक स्थिती सुधारण्याचे मोठे आव्हान आहे. पोर्तुगालची अर्थव्यवस्था ही पर्यटनावर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत कोरोना विषाणूची साथ आल्यानंतर देशाच्या आर्थिक क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. पोर्तुगीज सरकारला 2026 पर्यंत युरोपियन युनियनकडून मिळणारे 16.6 अब्ज युरो रिलीफ पॅकेज देखील जबाबदारीने वापरावे लागेल. त्यासाठी देशात स्थिर सरकारची गरज प्रकर्षाने जाणवत होती. भारतीय वंशाचे अँटोनियो कोस्टा 2015 पासून सत्तेत आहेत आणि त्यापूर्वी त्यांनी दोनदा डाव्या पक्षांसोबत आघाडी करून सरकारचे नेतृत्व केले होते. 2019 च्या निवडणुका जिंकल्यानंतर ते दोन लहान डाव्या पक्षांच्या पाठिंब्याने सरकार चालवत होते.

गोव्याचे मोझांबिक - अंगोलाशी नाते

गोवा येथे मोझांबिक आणि अंगोला या पोर्तुगीजांच्या आफ्रिकेतील महत्त्वाच्या आणि दीर्घकाळ टिकलेल्या वसाहती होत्या. त्यामुळे तेथिल मोझांबिक आणि अंगोलाशी गोवन लोकांचा संबंध येत असे. गोव्यातील (Goa) लोक मोठय़ा संख्येने आफ्रिकेत स्थलांतरित झाले आहेत. अँटोनियो यांचे आजोबा लुईस अफोन्सो मोझांबिकमध्ये होते. 451 वर्षाच्या पोतरुगाल-गोवा संबंधांमुळे हजारो गोवन नागरिक पोर्तुगालमध्येही स्थायिक झाले.

मतदार काय म्हणतात?

कॅटिया रीस, 39 वर्षांची एचआर मॅनेजर, म्हणते, " ही वेळ राजकीय बदलाची नाही तर देशाला स्थिरतेची गरज आहे, म्हणून मी समाजवादी पक्षाला मतदान केले. " कोस्टा यांच्या कार्यकाळात सरकारने तूट नियंत्रणात ठेवली, किमान वेतनात लक्षणीय वाढ केली आणि महामारीपूर्वी बेरोजगारीचा दर कमी केला. येथील 90% लोकसंख्येचे संपूर्ण लसीकरण झाले आहे. मॅन्युएल पिंटो, सेवानिवृत्त 68 वर्षीय सुतार VS/NR (AFP, DPA) म्हणतात की, "मी समाजवादी पक्षाला मतदान केले कारण आम्हाला या कठीण काळात त्यांची गरज आहे."

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT