Pope Francis Dainik Gomantak
ग्लोबल

Pope Francis: पोप फ्रान्सिस म्हणाले सेक्स ही जगातली सगळ्यात.... डॉक्युमेंटरीत धक्कादायक मते

डॉक्युमेंटरीत गर्भपात, समलैंगिकतेवर व्यक्त केली सडेतोड मते

दैनिक गोमन्तक

Pope Francis: 'द पोप आन्सर्स' असे या डॉक्युमेंटरीचे नाव असून ती डिस्ने प्रॉडक्शनने बनवली आहे. वयाच्या ऐन विशीमध्ये असलेल्या 10 तरुणांची गेल्या वर्षी रोममध्ये पोप फ्रान्सिस यांनी भेट घेतली होती. त्यावर ही डॉक्युमेंटरी आधारीत आहे. पोप फ्रान्सिस यांनी एका डॉक्युमेंटरीसाठी दिलेल्या मुलाखतीत सेक्सच्या गुणांची प्रशंसा केली आणि "देवाने मानवाला दिलेल्या सुंदर गोष्टींपैकी एक" असे म्हटले.

"द पोप आन्सर्स" हा डॉक्युमेंट्री ही मूळ स्पॅनिश स्पेशल आहे. डॉक्युमेंटरीमध्ये त्यांनी सांगितले की, "सेक्स ही एक सुंदर गोष्ट आहे जी देवाने मानवाला दिली आहे." हस्तमैथुनाचा संदर्भ देत पोप म्हणाले की, लैंगिकरित्या स्वतःला व्यक्त करणे म्हणजे "श्रीमंतता". लैंगिक अभिव्यक्तीपासून वंचित राहिल्यास तुमच्यातील समृद्धताही कमी होते" असे ते म्हणाले.

चर्चमध्ये एलजीबीटी समुदायाचे स्वागत

'नॉन-बायनरी व्यक्ती' माहिती आहेत का असे विचारल्यावर पोप फ्रान्सिस म्हणाले की, होय. माहिती आहे. एलजीबीटी लोकांचे कॅथोलिक चर्चने स्वागत केले पाहिजे, असा पुनरुच्चार त्यांनी केला. ते म्हणाले की, सर्व पुरुष देवाची मुले आहेत. देव कोणालाही नाकारत नाही, देव पिता आहे. आणि चर्चमधून कोणालाही हाकलून देण्याचा मला अधिकार नाही.'

गर्भपाताबद्दल पोप फ्रान्सिस म्हणाले की, गर्भपात करणार्‍या स्त्रियांबद्दल दयाळूपणा दाखवला पाहिजे. तथापि, ही प्रथा अस्वीकारार्ह असल्याचेही ते म्हणाले. एका गर्भपाताला पाठिंबा देणे वेगळे आणि गर्भपात या कृतीचे समर्थन करणे वेगळे, असेही ते म्हणाले.

पोप फ्रान्सिस यांची ही मते व्हॅटिकनचे अधिकृत वृत्तपत्र असलेल्या L'Osservatore Romano नेही प्रकाशित केली होती. त्यात पोप यांनी तरूणांशी साधलेला दिलखुलास आणि प्रामाणिक संवाद असे वर्णन केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबूज: ...आणि युरीचे दोन्ही समर्थक खुश झाले

Goa Politics: आरजीचे राजकीय भविष्य काय? पक्षावर कोणाचा ताबा? वीरेश बोरकरांनी शिस्तपालन समिती नेमली अन्...

Bike Stunt Viral Video: रीलच्या नादात मोडली हाडं! पठ्ठ्याच्या स्टंटबाजीचा थरारक व्हिडिओ व्हायरल; संताप व्यक्त करत नेटकरी म्हणाले, "हा याच लायकीचा होता...''

Goa Politics: गोव्यात सरकारी कार्यक्रमांच्या नावाखाली जनतेच्या पैशांची लूट? क्रीडा खात्याच्या संचालकांना घेतलं फैलावर; काँग्रेस आक्रमक

Goa Pocso Case: मुलीने कोर्टात फिरवली साक्ष! रागाच्या भरात वडिलांविरोधात खोटी तक्रार केली; 38 वर्षीय नेपाळी नागरिकाची निर्दोष मुक्तता

SCROLL FOR NEXT