Pakistan People Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan Economic Crisis: जिन्नांच्या पाकिस्तानला IMF कडून 'जोर का झटका', देश उध्वस्त होण्याच्या मार्गावर...

Pakistan Crisis: कर्जबाजारी पाकिस्तानला पुन्हा एकदा जोरदार झटका बसला आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) कर्जाचा प्रस्ताव पुन्हा फेटाळला आहे.

दैनिक गोमन्तक

Pakistan Economic Crisis: पाकिस्तान सध्या आर्थिक संकटाबरोबर राजकीय संकटाचा देखील सामना करत आहे. दिवसेंदिवस महागाई गगनाला भिडत आहे. यातच आता कर्जबाजारी पाकिस्तानला पुन्हा एकदा जोरदार झटका बसला आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) कर्जाचा प्रस्ताव पुन्हा फेटाळला आहे. पाकिस्तान सध्या अत्यंत वाईट स्थितीतून जात आहे. त्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा पूर्णपणे मोडला आहे. कटोरा घेऊन तो प्रत्येक देशाकडे कर्जासाठी भीक मागत आहे.

दरम्यान, चीनने (China) त्याला खूप मोठ्याप्रमाणात कर्ज दिले आहे, पण त्याचा व्याजदर खूप जास्त आहे. अरब आणि यूएईनेही देखील पाकिस्तानपासून फारकत घेण्यास सुरुवात केली आहे. कर्ज फेडण्यासाठीच पाकिस्तानला मोठ्या कर्जाची गरज आहे.

दुसरीकडे, पाकिस्तानला IMF कडून मोठी आशा होती, पण IMF नेही पाकिस्तानला दणका दिला आहे. दैनंदिन वस्तूंचा तुटवडा, पेट्रोलचे गगनाला भिडलेले भाव, विजेचा तुटवडा आणि अंधारात बुडलेल्या देशाची अवस्था अशीच दीर्घकाळ चालू राहिली तर भविष्यात जिन्नांच्या या देशाची फाळणी होऊ शकते.

IMF कडे 23 वेळा मदत मागून अनोखा विक्रम केला

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने पाकिस्तानला (Pakistan) पुन्हा एकदा धक्का दिला आहे. बेलआउट पॅकेजसाठी आयएमएफशी संपर्क साधणारे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी सादर केलेली सर्क्युलर लोन प्लान नाकारण्यात आले आहे. पाकिस्तानने IMF कडे 23 वेळा मदतीसाठी जाऊन नवा विक्रम केला आहे.

सध्या, पाकिस्तानसाठी परिस्थिती खूप कठीण आहे. पाकिस्तानने आयएमएफचे कर्ज मिळवण्यासाठी अमेरिकेचीही मदत घेतली आहे. यादरम्यान चीनकडून कर्ज मिळाले आहे, पण त्यावरचे व्याज इतके जास्त आहे की, ते फेडणे फार कठीण आहे. भारतापासून फारकत घेऊन निर्माण झालेला हा देश आता पूर्ण विघटनाकडे वाटचाल करत आहे.

चीनकडून कर्ज मिळाले, पण व्याजदर खूप जास्त आहेत

चीनकडे कर्ज मागण्याचे धाडस पाकिस्तान करु इच्छित नाही, कारण चीनच्या कर्जावरील व्याजदर जास्त आहे. पाकिस्तानला सर्वाधिक कर्ज देणारा देशही चीनचं आहे. पाकिस्तानवर चीनचे एकूण 30 अब्ज डॉलरचे कर्ज आहे. हे देशाच्या एकूण कर्जाच्या 30 टक्के आहे.

परंतु आता चीनचे व्याजदर आणि आयएमएफच्या मागण्यांमध्ये पाकिस्तान अडकला आहे. गेल्या महिन्यात, पाकिस्तानला यूएईकडून तीन अब्ज डॉलर्सची आर्थिक मदत मिळाली. सौदी अरेबियाने पाकिस्तानला एक अब्ज डॉलर्सची मदत दिली आहे. ही रक्कम एका महिन्याची तेल आयात भागवण्यासाठीही पुरेशी नाही.

त्याचबरोबर, गेल्या वर्षी पाकिस्तानात आलेल्या पुरामुळे अर्थव्यवस्थेवरील संकट अधिकच गडद झाले. या पुरामुळे देशाचे सुमारे 30 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले. आंतरराष्ट्रीय स्तरावर विविध देशांनी पाकिस्तानला नऊ अब्ज डॉलर्स देण्याची घोषणा केली आहे.

शिवाय, देशाचा परकीय चलन साठा 3.2 अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. हा आकडा खूपच चिंताजनक असून केवळ तीन आठवड्यांच्या आयातीसाठी आहे. जरी आयएमएफने पाकिस्तानशी करार केला तरी पैसे मिळण्यास वेळ लागेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT