Pakistan Economic Crisis: 'खिशात नाही पैसा अन्...', कंगाल पाकिस्तानचा शौकच निराळा; वाचा संपूर्ण प्रकरण

Pakistan: पाकिस्तानची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपयाची सातत्याने घसरण होत आहे.
Submarine
SubmarineDainik Gomantak

Pakistan Economic Crisis: पाकिस्तानची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपयाची सातत्याने घसरण होत आहे, तर अनेक दैनंदिन वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. आतून पोकळ झालेला पाकिस्तान वीरता दाखवण्यासाठी शस्त्रास्त्रांचे आधुनिकीकरण करत आहे.

अलीकडेच, तुर्कस्तानने अ‍ॅगोस्टा 90B श्रेणीची सुधारित PNS खालिद ही पाणबुडी पाकिस्तानला परत दिली. याआधीही तुर्कीने पीएनएस हमजाला अपग्रेड केले आहे.

तुर्की कंपनीने पाणबुडी अपग्रेड केली

पाकिस्तानी पाणबुडी पीएनएस खालिद अपग्रेड केलेल्या तुर्की कंपनीचे नाव एसटीएम डिफेन्स टेक्नॉलॉजीज इंजिनिअरिंग अँड ट्रेड आहे. ही तुर्कीच्या संरक्षण क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांपैकी एक आहे. अलीकडेच या कंपनीने एका समारंभात पीएनएस खालिद पाकिस्तानी नौदलाच्या कमांडकडे सुपूर्द केली.

यापूर्वी, 21 एप्रिल 2021 रोजी पीएनएस हमजा पाकिस्तानच्या ताब्यात देण्यात आली होती. STM ने 2016 मध्ये पाणबुडी आधुनिकीकरण प्रकल्पाची निविदा जिंकली होती. तुर्की (Turkey) नौदलाच्या सेवेत नसलेल्या नौदल जहाजाचे आधुनिकीकरण करण्याची तुर्की कंपनीची ही पहिलीच वेळ होती.

Submarine
Pakistan Economic Crisis: पाकिस्तानचे 'अंबानी' मियां मोहम्मद मंशा यांचा शाहबाज सरकारला मोलाचा सल्ला !

पाणबुडीमध्ये काय सुधारणा करण्यात आली

पाकिस्तानी पाणबुडीचे अनेक सेन्सर, शस्त्रास्त्र प्रणाली अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रणालीसह अपग्रेड करण्यात आली आहे. अपग्रेड दरम्यान, पाणबुडी मूळ सोनार सूट, पेरिस्कोप प्रणाली, माहिती वितरण प्रणाली, कमांड आणि कंट्रोल सिस्टम, रडार आणि ईएसएमसह पुनर्निर्मित करण्यात आली.

पाणबुडींच्या सध्याच्या क्षमतेपेक्षा आधुनिकीकरणादरम्यान अतिरिक्त सुविधा देखील देण्यात आल्या आहेत. याव्यतिरिक्त, तुर्कीने ASELSAN आणि HAVELSAN कडून पाणबुडीसाठी अनेक प्रणाली निर्यात केल्या आहेत. पाणबुडीचे सर्व अपग्रेड्स DNV या आंतरराष्ट्रीय संस्थेने प्रमाणित केले आहेत. पाकिस्तानमधील (Pakistan) कराची शिपयार्ड आणि इंजिनिअरिंग वर्क्स येथे एसटीएमद्वारे पाणबुडीची दुरुस्ती करण्यात आली आहे.

Submarine
Pakistan Economic Crisis: पाक च्या बुडत्या अर्थव्यवस्थेला 'या' देशाचा आधार! मोठ्या गुंतवणूकीचे दिले संकेत

आर्थिक संकटामुळे पाकिस्तानात हाहाकार माजला आहे

पाकिस्तानमध्ये प्रचंड आर्थिक संकटामुळे खळबळ उडाली आहे. मैदा, स्वयंपाकाचा गॅस, पेट्रोल आदींसाठी लांबच लांब रांगा लागत आहेत. पाकिस्तानचीही श्रीलंकेसारखी अवस्था होण्याची भीती साऱ्या जगाला वाटत आहे. अशा परिस्थितीत संकटावर मात करण्यासाठी सर्व सरकारी विभागातील कर्मचाऱ्यांच्या पगारात 10 टक्के कपात करण्यासह अनेक प्रस्तावांवर विचार केला जात आहे.

Submarine
Pakistan Economic Crisis: जगाकडे भीक मागुनही फायदा नाही; आता केवळ मोदींचाच आधार

तसेच, पाकिस्तान सरकारला आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) कडून अधिक मदत हवी आहे. या कारणास्तव, US $ 6 अब्ज कर्ज मिळविण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची प्रत्येक अट मान्य केली आहे. आयएमएफनेही या महिन्याच्या अखेरीस टीम पाठवण्याबाबत बोलले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com