Prime Minister Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका-इजिप्त दौऱ्यावरुन परतताच पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. पाकव्याप्त काश्मीर (पीओके) पासून ते सिंध आणि बलुचिस्तानपर्यंत पाकिस्तानविरोधातील बंड पुन्हा तीव्र झाले आहे. हे तिन्ही प्रदेश भारतात सामील होऊ इच्छितात.
इथे यापूर्वीही अनेकदा स्थानिक रहिवाशांनी स्वत:ला भारतात समाविष्ट करण्याची मागणी केली आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानचा नकाशा बदलण्याची वेळ जवळ आली आहे, असे मानले जात आहे.
दरम्यान, सिंध आणि बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानविरुद्ध बंड पुष्कळ काळापासून सुरु आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील निदर्शनांनी शाहबाज सरकारची झोप उडवली आहे. दुसरीकडे, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही आता पीओके ताब्यात घेण्याची वेळ जवळ आल्याचे म्हटले आहे.
विशेष म्हणजे, संसदेत पीओकेबाबत एकमताने ठराव मंजूर करण्यात आला आहे. तो भारताचा भाग होता, आहे आणि यापुढेही राहील. संरक्षणमंत्र्यांच्या या वक्तव्याने पाकिस्तानची (Pakistan) पुरती झोप उडाली आहे.
पाकिस्तानी लोकही मोदी सरकारकडे मदतीची याचना करत आहेत. तर पाकिस्तानमधील एका वृद्ध व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो स्वत:ला सिंधी हिंदू म्हणवून घेत आहे. तो सांगत आहे की, आमच्या हिंदू मुलींवर खूप अत्याचार होत आहेत. कृपया मोदीजी आणि अमित शाह आम्हाला वाचवा.
पीओकेमध्ये बांधलेल्या शारदी पीठ मंदिराचे नुकतेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यानंतर त्यांनी काश्मीर ते पीओकेपर्यंत कॉरिडॉर बनवण्याची घोषणाही केली होती.
दोन पाकिस्तानी पत्रकारांनी सांगितले की, अमित शाह यांच्या घोषणेनंतर पीओकेच्या आमदारांनी विधानसभेत कॉरिडॉरसाठी एकमताने ठराव मंजूर केला. भारत आणि पीओकेमध्ये अंतर्गत काहीतरी सुरु आहे.
जम्मू आणि काश्मीरचा एक मोठा भाग ज्याला आपण पाकव्याप्त काश्मीर म्हणून ओळखतो. तिथले लोक बघत आहेत की या बाजूला, म्हणजे भारतात लोक शांततेने आपले जीवन जगत आहेत... आणि तिथे जेव्हा पाकिस्तान सरकारकडून त्यांच्यावर अत्याचार होतो, त्यांच्यावर अन्याय होतो, तेव्हा त्यांना वेदना होतात.
दुसरीकडे, राजनाथ सिंह जे बोलत आहेत ते पहिल्यांदाच घडत नाहीये... पाकिस्तानच्या ताब्यातील अनेक भागात जसे की, नियंत्रण रेषेपलीकडे PoK ते सिंध आणि बलुचिस्तान अशा अनेक भागात पाकिस्तानी लष्कर आणि पाकिस्तानी सरकारच्या विरोधात काहीतरी धगधगत आहे.
होय.. आणि त्याची जाणीव या बाजूला जाणवते आहे, म्हणजे काश्मीर आणि लेह लडाख... फक्त योग्य वेळेची आणि योग्य पावले उचलण्याची गरज आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.