Holi In Pakistan: पाकिस्तानाच्या विद्यापीठात होळीच्या सणावर बंदी, व्हायरल व्हिडिओने उडाली खळबळ

Pakistan Bans Holi Celebrations In Universities: पाकिस्तानात अल्पसंख्याकांवर होणारे अत्याचार कोणापासून लपलेले नाहीत.
Pakistan Bans Holi Celebrations In Universities
Pakistan Bans Holi Celebrations In UniversitiesDainik Gomantak
Published on
Updated on

Pakistan Bans Holi Celebrations In Universities: पाकिस्तानात अल्पसंख्याकांवर होणारे अत्याचार कोणापासून लपलेले नाहीत. पाकिस्तानात हिंदूंना त्यांचे सण उघडपणे साजरे करण्याचे स्वातंत्र्यही नाही. याचे ताजे उदाहरण म्हणजे पाकिस्तानच्या उच्च शिक्षण आयोगाचा (एचईसी) निर्णय, ज्याअंतर्गत पाकिस्तानातील सर्व विद्यापीठांमध्ये होळीच्या सणावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

दरम्यान, इस्लामाबादच्या (Islamabad) कायद-ए-आझम विद्यापीठात हजारो विद्यार्थ्यांची होळी खेळतानाचा व्हिडिओ अलीकडेच व्हायरल झाला होता. यावरुन संपूर्ण पाकिस्तानात गदारोळ झाला होता.

वास्तविक, रंगांचा हा सुंदर सण साधारणपणे मार्चमध्ये साजरा केला जायचा, मात्र यंदा विद्यापीठ बंद असल्याने तो जूनमध्ये साजरा करण्यात आला. येथे शिकणारे सर्व धर्माचे विद्यार्थी एकत्र येऊन होळी साजरी करताना दिसले.

Pakistan Bans Holi Celebrations In Universities
Pakistan PM Shehbaz Sharif: शाहबाज शरीफ सोडणार खुर्ची? पाकिस्तानच्या पंतप्रधान पदाबाबत आली मोठी बातमी!

पाकिस्तानी विद्यार्थ्यांना होळीची क्रेझ

तसेच, या व्हिडिओमध्ये पाकिस्तानातील (Pakistan) एक विद्यापीठ होळीच्या रंगांनी रंगले आहे. इस्लामाबादमधील सरकारी अनुदान असलेल्या कायद-ए-आझम विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी होळीचा सण साजरा केला.

या विद्यापीठात होळीचा सण 12 जून रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. होळीच्या या उत्सवात विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी रंगांची उधळण करत एकमेकांसोबत होळी साजरी केली. काहींनी याला पश्तो शैलीतील होळी म्हटले, तर काहींनी त्याचा अर्थ वेगळ्या प्रकारे लावला.

Pakistan Bans Holi Celebrations In Universities
TTP in Pakistan: पाकिस्तानचे तुकडे? बलूचिस्तानमध्ये सत्ता स्थापन केल्याचा पाकिस्तानी तालिबानचा दावा

पाकिस्तानात खळबळ

कायदे-ए-आझम विद्यापीठाने आपल्या ट्विटर अकाऊंटवर होळीच्या उत्सवाचे अनेक व्हिडिओ शेअर केले आहेत. या व्हिडिओंना आत्तापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. लोक त्याला खूप पसंतही करत आहेत.

पण दुसरीकडे, पाकिस्तानातील अनेक कट्टरपंथीही या व्हिडिओवर टीका करत आहेत. एकूणच या व्हिडिओवर संमिश्र प्रतिक्रीया येत आहेत. पाकिस्तानात सरकार कोणत्याही पक्षाचे असो, त्यांना कट्टरवाद्यांच्या दबावापुढे झुकावे लागते. त्यामुळे विद्यापीठांमध्ये होळीच्या सणावर बंदी घालण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com