PM Modi  Dainik Gomantak
ग्लोबल

PM Modi In Egypt: PM मोदींना इजिप्तचा सर्वोच्च सन्मान 'ऑर्डर ऑफ द नाईल' प्रदान, आतापर्यंत 13 देशांनी केले सन्मानित

PM Modi In Egypt: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इजिप्तचा सर्वोच्च सन्मान 'ऑर्डर ऑफ द नाईल' प्रदान करण्यात आला आहे.

Manish Jadhav

PM Modi In Egypt: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना इजिप्तचा सर्वोच्च सन्मान 'ऑर्डर ऑफ द नाईल' प्रदान करण्यात आला आहे. राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांनी त्यांना हा सन्मान स्वतःच्या हातांनी दिला. आतापर्यंत 13 देशांनी पंतप्रधान मोदींना सर्वोच्च सन्मान दिला आहे.

तत्पूर्वी, त्यांनी बोहरा समुदयाच्या अल-हकीम या मशिदीला भेट दिली. कैरो येथील हेलिओपोलिस कॉमनवेल्थ वॉर मेमोरिअललाही मोदींनी भेट दिली.

येथे त्यांनी भारतीय लष्करातील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. इजिप्तला द्विपक्षीय भेट देणारे नरेंद्र मोदी हे 26 वर्षांतील पहिले पंतप्रधान आहेत. पंतप्रधान मोदींनी इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अल-सिसी यांच्याशीही द्विपक्षीय चर्चा केली.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा इजिप्त (Egypt) दौरा अतिशय खास आहे. सप्टेंबर महिन्यात भारत G20 देशांचे यजमानपद भूषवणार आहे. यानिमित्ताने इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्देल अल सिसीही भारतात येणार आहेत. इजिप्त हा G20 चा भाग नसून भारताच्या विशेष निमंत्रणावरुन जगातील सर्वात शक्तिशाली देशांच्या बैठकीत सहभागी होणार आहे.

13 देशांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा गौरव केला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आतापर्यंत 13 देशांनी आपल्या देशाच्या सर्वोत्तम पुरस्काराने सन्मानित केले आहे. गेल्या 9 वर्षांत सौदी अरेबिया, अफगाणिस्तान, अमेरिका (America), पॅलेस्टाईनसह 13 देशांनी पंतप्रधानांना सन्मानित केले आहे.

सर्वप्रथम, सौदी अरेबियाला 2016 मध्ये ऑर्डर ऑफ अब्दुलअजीझ अल-सौद प्रदान करण्यात आला. पंतप्रधान मोदी हे पहिले व्यक्ती आहेत, ज्यांना गैर-मुस्लिम म्हणून हा सर्वोत्तम सन्मान मिळाला आहे. याशिवाय, पॅलेस्टाईनला ग्रँड कॉलर ऑफ द स्टेट ऑफ पॅलेस्टाईन पुरस्कार देण्यात आला.

इजिप्तचे महान धर्मगुरु म्हणाले..

इजिप्तचे सर्वात महान मौलवी मुफ्ती डॉ. शौकी इब्राहिम अब्देल करीम अल्लम यांनी रविवारी कैरोमध्ये पंतप्रधान मोदींची भेट घेतली. यावेळी त्यांनी मोदींना खास भेटही दिली. ते म्हणाले की, 'भारताने खूप विकास केला आहे.'

भारतासारख्या मोठ्या देशात मोदींच्या नेतृत्वाचेही त्यांनी कौतुक केले. मुफ्ती शौकी म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी अशी धोरणे बनवली आहेत की, ज्याचा भारतातील प्रत्येक नागरिकाला फायदा मिळाला आहे.

हेलिओपोलिस कॉमनवेल्थ वॉर मेमोरिअललाही पंतप्रधान मोदींनी भेट दिली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी कैरो येथील हेलिओपोलिस कॉमनवेल्थ वॉर मेमोरिअलला भेट दिली. पहिल्या महायुद्धात इजिप्त आणि पॅलेस्टाईनमध्ये लढताना आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या भारतीय जवानांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली.

त्याचबरोबर, तिथे ठेवलेल्या व्हिजिटर बुकवर स्वाक्षरी केली. मेमोरिअलमध्ये हेलिओपोलिस (पोर्ट तौफिक) स्मारक आणि हेलिओपोलिस (एडेन) स्मारक समाविष्ट आहे.

हेलिओपोलिस (पोर्ट तौफिक) स्मारक हे सुमारे 4,000 भारतीय सैनिकांना समर्पित आहे, ज्यांनी पहिल्या महायुद्धात इजिप्त आणि पॅलेस्टाईनमध्ये लढताना आपले प्राण गमावले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kabul Bus Accident: काबूलमध्ये भीषण अपघात, प्रवासी बस उलटून 25 जणांचा मृत्यू; 27 जखमी

Love Horoscope: जोडीदाराला थोडा वेळ द्या! अनुभवा 'मोठे' बदल; वाचा प्रेम राशीफळ

Michael Clarke Cancer: विश्वचषक जिंकवून देणाऱ्या स्टार क्रिकेटपटूला कर्करोग, पोस्ट करत दिली माहिती

तवडकरांना मिळाली गावडेंकडे असलेली सर्व खाती, 'आदिवासी कल्याण'ही पाहणार; कामतांकडे PWD, आणखी 2 मंत्र्यांना मिळाली 2 खाती

Bicholim: डिचोलीत झाली 4 टन फुलांची विक्री, भाव वाढल्याने विक्रेते आनंदी; चतुर्थीच्या पूर्वदिनी 'अच्छे दिन'

SCROLL FOR NEXT