PM Modi Al-Hakim Mosque Visit: पीएम मोदींनी दिली 11 व्या शतकातील अल-हकीम मशिदीला भेट, बोहरा मुस्लिमांशी आहे खास कनेक्शन

India-Egypt Relations: अमेरिकेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी दोन दिवसांच्या राजकीय दौऱ्यावर इजिप्तला पोहोचले.
PM Modi Al-Hakim Mosque Visit
PM Modi Al-Hakim Mosque VisitTwitter/ @ANI
Published on
Updated on

India-Egypt Relations: अमेरिकेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी दोन दिवसांच्या राजकीय दौऱ्यावर इजिप्तला पोहोचले. इजिप्तचे पंतप्रधान मुस्तफा मादबौली यांनी विमानतळावर पंतप्रधानांचे आलिंगन देऊन स्वागत केले. 26 वर्षात भारतीय पंतप्रधानांची ही पहिलीच इजिप्त भेट आहे.

दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यासाठी पंतप्रधान मोदी 25 जून म्हणजेच रविवारी कैरोमधील इमाम अल-हकीम बी अमर अल्लाह मशिदीला भेट दिली.

दरम्यान, इजिप्तचे (Egypt) राष्ट्राध्यक्ष एल-सिसी यांच्या निमंत्रणावरुन पंतप्रधान मोदी कैरोला पोहोचले. यादरम्यान त्यांनी राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांच्यासह दोन्ही देशांमधील धोरणात्मक संबंध पुढे नेण्यासाठी इतर नेत्यांशी चर्चा केली.

अल-हकीम ही 11व्या शतकातील मशीद आहे, जी दाऊदी बोहरा समुदायाच्या मदतीने नूतनीकरण करण्यात आली होती. कैरोमधील ही मशीद दाऊदी बोहरा समुदायासाठी एक महत्त्वाचे सांस्कृतिक ठिकाण आहे.

PM Modi Al-Hakim Mosque Visit
PM Modi Egypt Visit: इजिप्तमध्ये 'मोदी-मोदी', मुलीने गायले ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे; पीएम मोदी म्हणाले...

दुसरीकडे, विमानतळावर पंतप्रधान मोदींचे औपचारिक स्वागत करण्यासोबतच त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. कैरोला पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'मला विश्वास आहे की या भेटीमुळे भारताचे इजिप्तसोबतचे संबंध दृढ होतील.

मी राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांच्याशी चर्चा करण्यास आणि इतर कार्यक्रमांमध्ये भाग घेण्यासाठी उत्सुक आहे.' पंतप्रधानांचे येथील हॉटेलमध्ये आगमन झाल्यावर भारतीय समुदायाच्या सदस्यांनी तिरंगा फडकवत 'मोदी, मोदी' आणि 'वंदे मातरम'च्या घोषणा देत त्यांचे स्वागत केले.

पंतप्रधान मोदींचा हा दौरा खूप खास

दाऊदी मुस्लिम समुदायावर लक्ष केंद्रित करुन, 1,000 वर्ष जुन्या मशिदी इमाम अल-हकीम बी अमर अल्लाह मशिदीला पंतप्रधान मोदींनी भेट दिली. विशेष म्हणजे, गुजरातमध्ये (Gujarat) शासन चालवण्यासाठी मदत केल्याबद्दल मोदींनी नेहमीच समुदायाला श्रेय दिले आहे.

16 व्या फातिमिद खलिफा अल-हकीम द्वि-अम्र अल्लाह (985-1021) यांच्या नावावर असलेल्या कैरोमधील ऐतिहासिक आणि प्रमुख अल-हकीम मशीद येथे पंतप्रधानांनी सुमारे अर्धा तास घालवला.

PM Modi Al-Hakim Mosque Visit
PM Modi US Visit: मोदी-बायडन मैत्रीचा नवा अध्याय, भारताला 'या' 8 करारामधून लॉटरी

भारतातील दाऊदी बोहरा मुस्लिम लोकसंख्या

दाऊदी बोहरा हा इस्लामच्या अनुयायांचा एक पंथ आहे, जो फातिमिद इस्माइली तयीबी विचारसरणीचे अनुसरण करतो. पंथाचा उगम इजिप्तमधून झाला आणि नंतर येमेनमध्ये त्याचा विस्तार झाला असे मानले जाते.

दाऊदी बोहरा मुस्लिम 11 व्या शतकात भारतात स्थायिक झाले. विशेष म्हणजे, पंथाची सीट वर्ष येमेनमधून 1539 साली भारतातील सिद्धपूर (गुजरातचा पाटण जिल्हा) येथे हलवण्यात आली. अधिकृत आकडेवारीनुसार, आपल्या देशात बोहरा मुस्लिमांची लोकसंख्या 5 लाख आहे. बोहरा मुस्लिम समाज महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात असूनही गुजरातमधील सुरतला आपला आधार मानतो.

पंतप्रधान मोदींचे खास संबंध

गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून पंतप्रधान मोदींचे दाऊदी बोहरा समुदयाशी खास संबंध आहेत. 2011 मध्ये गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी दाऊदी बोहरा समुदयाचे तत्कालीन धर्मप्रमुख सय्यदना बुरहानुद्दीन यांचा 100 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी समुदायाला आमंत्रित केले होते.

2014 मध्ये बुरहानुद्दीन यांचे निधन झाल्यानंतर, पंतप्रधान मोदी त्यांचे पुत्र आणि उत्तराधिकारी सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन यांना भेटण्यासाठी मुंबईला गेले होते.

PM Modi Al-Hakim Mosque Visit
PM Modi State Dinner in US: PM मोदींसाठी व्हाईट हाऊसमध्ये खास डिनर, मिलेट केकसह 'या' स्पेशल पदार्थांचा समावेश...

तसेच, 2015 मध्ये, पंतप्रधान मोदी समुदयाचे वर्तमान धर्मप्रमुख, सय्यदना मुफद्दल सैफुद्दीन यांना भेटले, ज्यांच्याशी त्यांचे नेहमीच सौहार्दपूर्ण संबंध राहिले आहेत.

2018 मध्ये, दाऊदी बोहरा समुदायाने इंदूरमधील सैफी मस्जिद येथे इमाम हुसैन (SA) यांच्या हौतात्म्याच्या स्मरणार्थ आश्र मुबारकचे आयोजन केले होते, ज्यामध्ये समुदायातील एक लाखाहून अधिक सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान पंतप्रधानांनी उपस्थितांना संबोधित केले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com