PM Modi Egypt Visit: इजिप्तमध्ये 'मोदी-मोदी', मुलीने गायले ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे; पीएम मोदी म्हणाले...

India-Egypt Relations: अमेरिकेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी दोन दिवसांच्या राजकीय दौऱ्यावर इजिप्तला पोहोचले.
PM Modi Egypt Visit
PM Modi Egypt VisitDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

India-Egypt Relations: अमेरिकेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी दोन दिवसांच्या राजकीय दौऱ्यावर इजिप्तला पोहोचले. इजिप्तचे पंतप्रधान मुस्तफा मादबौली यांनी विमानतळावर पंतप्रधानांचे आलिंगन देऊन स्वागत केले.

26 वर्षात भारतीय पंतप्रधानांची ही पहिलीच इजिप्त भेट आहे. इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष एल-सिसी यांच्या निमंत्रणावरुन पंतप्रधान मोदी कैरोला पोहोचले. यादरम्यान ते राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांच्यासह दोन्ही देशांमधील धोरणात्मक संबंध पुढे नेण्यासाठी इतर नेत्यांशी चर्चा करतील.

दरम्यान, विमानतळावर पंतप्रधान मोदींचे औपचारिक स्वागत करण्यासोबतच त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. कैरोला पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, 'मला विश्वास आहे की या भेटीमुळे भारताचे इजिप्तसोबतचे संबंध दृढ होतील.

मी राष्ट्राध्यक्ष अब्देल फताह अल-सिसी यांच्याशी चर्चा करण्यास आणि इतर कार्यक्रमांमध्ये भाग घेण्यासाठी उत्सुक आहे.' पंतप्रधानांचे येथील हॉटेलमध्ये आगमन झाल्यावर भारतीय समुदायाच्या सदस्यांनी तिरंगा फडकवत 'मोदी, मोदी' आणि 'वंदे मातरम'च्या घोषणा देत त्यांचे स्वागत केले.

PM Modi Egypt Visit
PM Modi US Visit: मोदी-बायडन मैत्रीचा नवा अध्याय, भारताला 'या' 8 करारामधून लॉटरी

दुसरीकडे, साडी परिधान केलेल्या इजिप्शियन मुलीने शोले चित्रपटातील प्रसिद्ध गाणे 'ये दोस्ती हम नही तोडेंगे' गाऊन मोदींचे स्वागत केले.

पंतप्रधान त्या मुलीचे गाणे लक्षपूर्वक ऐकताना दिसले. विशेष म्हणजे, तिने आपल्याला फार कमी हिंदी येत असल्याचे सांगितल्यावर त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'तुम्ही इजिप्तची कन्या की भारताची कन्या, हेही कुणाला कळणार नाही.'

काय आहे पीएम मोदींचे वेळापत्रक

रविवारी मोदी इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष एल-सिसी यांची भेट घेणार आहेत. मोदी त्यांचे समकक्ष मादबौली यांच्या नेतृत्वाखालील इजिप्शियन मंत्रिमंडळासोबत भारतावर केंद्रित गोलमेज चर्चेला उपस्थित राहणार आहेत.

मोदी इजिप्तचे ग्रँड मुफ्ती डॉ. शौकी इब्राहिम अब्देल-करीम आलम यांची भेट घेतील आणि नंतर इजिप्तच्या प्रमुख विचारवंतांशी चर्चा करतील.

PM Modi Egypt Visit
PM Modi America Visit: '...पंतप्रधान मोदी 'या' मशिदीला भेट देणार,' दाऊदी बोहरा समुदायाशी आहे खास कनेक्शन

पंतप्रधान 11व्या शतकातील मशिदीला भेट देणार आहेत

मोदी रविवारी दाऊदी बोहरा समुदायाच्या मदतीने जीर्णोद्धार केलेल्या 11व्या शतकातील अल-हकीम मशिदीलाही भेट देतील. ही मशीद फातिमी राजवंशाच्या राजवटीत बांधण्यात आली होती. भारतातील बोहरा समुदाय प्रत्यक्षात फातिमी राजवंशातून आला आणि त्यांनी 1970 पासून मशिदीचे नूतनीकरण केले.

हेलिओपोलिस कॉमनवेल्थ वॉर ग्रेव्ह सिमेट्रीला भेट देतील

कैरोमध्ये, पंतप्रधान 'हेलिओपोलिस कॉमनवेल्थ वॉर ग्रेव्ह सिमेट्री' या पवित्र स्थळाला भेट देतील. पहिल्या महायुद्धात इजिप्त आणि पॅलेस्टाईनमध्ये सेवा बजावत असताना मृत्यू पावलेल्या सुमारे 3,799 भारतीय सैनिकांच्या स्मृतीला समर्पित स्मारक उभारण्यात आले आहे.

PM Modi Egypt Visit
PM Modi America Visit: 'चीनसोबतच्या द्विपक्षीय संबंधांसाठी सीमेवर...', पीएम मोदींचं रोखठोक मत

त्याचबरोबर, राष्ट्राध्यक्ष अल-सिसी यावर्षी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून भारत दौऱ्यावर आले होते. पंतप्रधानांचा इजिप्त दौरा त्यांच्या दौऱ्याच्या 6 महिन्यांत होत आहे. एल-सिसी सप्टेंबरमध्ये G-20 शिखर परिषदेसाठी भारताला भेट देणार आहेत, जिथे इजिप्तला विशेष अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Best Places to Visit in October
PM Narendra Modi Birthday Wishes Times Square Billboard
Gen Z Voters India Elections
PM Modi Digital India New Chapter
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com