Donald Trump wishes PM Modi: देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५व्या वाढदिवसाचा उत्साह आहे. पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांना फोन करून शुभेच्छा दिल्या. या दोन्ही नेत्यांमधील मैत्रीपूर्ण संबंधांचे हे आणखी एक उदाहरण ठरले आहे. या संभाषणादरम्यान व्यापार आणि भू-राजकीय मुद्द्यांवरही चर्चा झाल्याचे वृत्त समोर आलेय.
पंतप्रधान मोदी यांनी 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ट्रम्प यांना धन्यवाद दिले. 'तुमच्याप्रमाणेच मी देखील भारत आणि अमेरिकेची व्यापक भागीदारी नव्या उंचीवर नेण्यासाठी पूर्णपणे कटिबद्ध आहे,' असे त्यांनी म्हटले. युक्रेन-रशिया युद्धाच्या शांततापूर्ण तोडग्यासाठी ट्रम्प यांच्या प्रयत्नांना भारताचा पाठिंबा असल्याचेही त्यांनी सांगितले.
ट्रम्प यांनीही त्यांच्या 'ट्रुथ सोशल' या माध्यमावर एक पोस्ट केली. 'माझे मित्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत नुकताच एक अप्रतिम फोन कॉल झाला. मी त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या! ते खूप चांगले काम करत आहेत,' असे ट्रम्प यांनी म्हटले.
'रशिया आणि युक्रेनमधील युद्ध संपवण्यासाठी तुमच्या पाठिंब्याबद्दल धन्यवाद, नरेंद्र!' असे म्हणत ट्रम्प यांनी भारताच्या भूमिकेचे स्वागत केले.
अमेरिकेने याआधी भारताला रशियन तेल खरेदी थांबवण्यासाठी विनंती केली होती, जेणेकरून रशियावर दबाव वाढेल. ट्रम्प प्रशासनाने भारताच्या वस्तूंवर ५० टक्के आयात शुल्क वाढवले होते, त्याचे एक कारण तेल आणि युक्रेन युद्ध असल्याचे मानले जाते. मात्र, या संवादातून दोन्ही देशांमधील संबंध पुन्हा सुरळीत होत असल्याचे संकेत मिळत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.