PM Modi Birthday: "मोदीजी दूरदर्शी नेते" मुख्यमंत्र्यांनी केले खास ट्विट; 75व्या वाढदिवसानिमित्त गोव्यातून शुभेच्छांचा वर्षाव

PM Modi 75th birthday wishes: मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि इतर मंत्र्यांनी ट्विट करून मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या
CM tweet on PM Modi birthday
CM tweet on PM Modi birthdayDainik Gomantak
Published on
Updated on

PM Modi 75th birthday celebrations: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि सामान्य नागरिकांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. गोव्यातही हा उत्साह दिसून येतोय. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि इतर मंत्र्यांनी ट्विट करून मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

'राष्ट्र प्रथम' या विचारावर भर

गोवा भाजपने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून '११ वर्षांची अथक सेवा, एकही दिवस सुट्टी नाही, १००% समर्पण, १००% बांधिलकी' अशा शब्दांत मोदींचे कौतुक केले.

तर, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मोदींना 'दूरदर्शी नेते, जे देव, देश, धर्म आणि जनकल्याणासाठी पूर्णपणे समर्पित आहेत' अशा शब्दांत शुभेच्छा दिल्या. 'त्यांचे नेतृत्व भारताला प्रगती आणि समृद्धीच्या मार्गावर घेऊन जावो,' अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

गोवा भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी मोदींच्या वाढदिवसानिमित्त एक खास व्हिडिओ शेअर करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

'माझे गुरु' म्हणून संबोधले

आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी पंतप्रधान मोदींना 'माझे गुरु' असे संबोधले. ते म्हणाले, 'एक सामान्य भाजप कार्यकर्ता म्हणून, मला त्यांच्या दूरदर्शी विचारातून आणि देशाप्रती असलेल्या अथक समर्पणातून प्रेरणा मिळते. 'राष्ट्र प्रथम' आणि 'विकसित भारत' यावर त्यांनी दिलेल्या भरमुळे केवळ धोरणेच बदलली नाहीत, तर माझ्यासारख्या लाखो भारतीयांमध्ये एक नवीन अभिमान आणि उद्देश निर्माण झाला आहे.'

CM tweet on PM Modi birthday
PM Modi Saudi Arabia Visit: पीएम मोदींच्या जेद्दाह दौऱ्यावर कोट्यवधींचा खर्च; दोन दिवसांच्या हॉटेल बिलाचा आरटीआयमधून खुलासा

पर्यटनमंत्री रोहन खवंटे यांनीही मोदींना शुभेच्छा देताना त्यांना 'विश्वगुरू' म्हणून गौरवले. 'जे भारतमातेचा अभिमान जागतिक स्तरावर उंचावतात, जे देशाच्या विकासासाठी, स्थैर्यासाठी आणि एकात्मतेसाठी २४ तास प्रयत्न करतात, अशा कर्मयोगी पंतप्रधानांना वाढदिवसाच्या शुभेच्छा,' असे त्यांनी म्हटले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com