Girl Dainik Gomantak
ग्लोबल

Philippines: जगातील 8 अब्जावा नागरिक कोण? Philippines मध्ये जन्मली खास मुलगी

Philippines: आज जगाची लोकसंख्या आठ अब्ज झाली आहे.

दैनिक गोमन्तक

Philippines: आज जगाची लोकसंख्या आठ अब्ज झाली. जगातील 8 अब्जावा नागरिक कोण आहे हे तुम्हाला माहीत आहे का? ही एक मुलगी आहे, जिचा जन्म फिलिपाइन्समधील मनिला येथील टोंडो येथे झाला आहे. स्थानिक वेळेनुसार पहाटे 1.29 वाजता डॉ. जोस फाबेला मेमोरियल हॉस्पिटलमध्ये जन्मलेल्या या मुलीचे नाव विनिस मबनसाग आहे. फिलीपिन्सच्या लोकसंख्या आणि विकास आयोगाने विनिसचा जन्मदिवस साजरा केला. आयोगाने मुलीचा आणि तिच्या आईचा फोटोही फेसबुकवर शेअर केला आहे.

खास फेसबुक पोस्ट लिहिली

फिलिपाइन्सच्या (Philippines) लोकसंख्या आणि विकास आयोगाने याबाबत फेसबुक पोस्टही लिहिली आहे. जगाच्या लोकसंख्येने एक माइलस्टोन गाठला आहे, असे लिहिले आहे. मनिला, टोंडो येथे जन्मलेल्या बाळाला प्रतिकात्मकदृष्ट्या जगातील आठ अब्जावा नागरिक मानले जाते. त्यात पुढे म्हटले की, बेबी विनिसचा जन्म 15 नोव्हेंबरला झाला. तिचा जन्म डॉ. जोस फॅबेला मेमोरियल हॉस्पिटलमध्ये परिचारिकांच्या देखरेखीखाली झाला. जगाची लोकसंख्या 8 अब्जांवर पोहोचल्याचे संयुक्त राष्ट्राने (United Nations) म्हटले आहे. यानुसार, लोक आता वाढलेल्या आयुर्मानासह आणि मृत्यूचा धोका कमी करुन जास्त आयुष्य जगत आहेत.

आठ अब्ज आशा

यासोबतच संयुक्त राष्ट्राने असेही म्हटले की, केवळ संख्या पाहण्याची गरज नाही. संयुक्त राष्ट्र पॉपुलेशन फंडने याबाबत ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये 8 अब्ज आशा, 8 अब्ज स्वप्ने, 8 अब्ज शक्यता असे लिहिले आहे. आपला ग्रह आता 8 अब्ज लोकांचे घर आहे. जागतिक लोकसंख्येमध्ये एक अब्ज लोकांची भर पडण्यासाठी 12 वर्षे लागली आहेत. पुढील वर्षी भारत (India) लोकसंख्येच्या बाबतीत चीनला मागे टाकेल, असेही यूएनने म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT