Philippines: फिलिपाईन्समध्ये पूर आणि भूस्खलनात 72 ठार; 33 जखमी, 14 बेपत्ता

फिलीपिन्स दरवर्षी 20 तीव्र वादळांचा सामना करते.
Philippines Flood
Philippines Flood Dainik Gomantak
Published on
Updated on

फिलिपाइन्सच्या दक्षिणेकडील प्रांतात मुसळधार पावसामुळे आलेल्या पूर आणि भूस्खलनात 72 जणांचा मृत्यू झाला आहे. यासह सुमारे 14 लोक बेपत्ता असून 33 जण जखमी झाले आहेत. पावसामुळे अनेक भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून त्यामुळे लोक घरातच अडकून पडले आहेत. पाऊस आणि भूस्खलनामुळे मृत झालेल्यांची संख्या 45 सांगण्यात आली होती. मागुइंदानाओ प्रांतातील 3 शहरे या पुरामुळे सर्वाधिक प्रभावित झाली आहेत.

Philippines Flood
T20 World Cup: न्यूझीलंडचे उपांत्य फेरीच्या दिशेने एक पाऊल; श्रीलंकेवर 65 धावांनी विजय

मागुइंदानाओ प्रांतात पूर आणि भूस्खलनामुळे सर्वाधिक मृत्यू झाल्याची नोंद आहे. रात्रभर पडणाऱ्या पावसामुळे नद्यांमध्ये खूप पाणी आले असून, सोबत मोठ्या प्रमाणावर कचरा आला आहे. त्यामुळे अनेक भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. काही ठिकाणी लोकांना मदत पाठविण्यासाठी आम्ही यशस्वी झाली असून, अशी काही क्षेत्रात अद्याप मदत पोहोचू शकलो नाही. अशी माहिती मंत्री नागुइब सिनारिम्बो यांनी दिली आहे.

Philippines Flood
Asthama: उत्तम आरोग्यासाठी अस्थमाच्या रुग्णांनी वाढत्या प्रदूषणात 'या' गोष्टी लक्षात ठेवाव्यात

हवामान खात्याच्या माहितीनुसार, नलगेई वादळामुळे परिसरात जोरदार पाऊस होत आहे. नलगेई शनिवारी पूर्व किनारपट्टी भागाला धडकण्याची शक्यता आहे. नलगेई 28 ऑक्टोबर रोजी दुपारी उत्तर समर प्रांतातील कॅटामरन या पूर्वेकडील शहरापासून 180 किमी अंतरावर होते. हे वादळ 85 किमी प्रतितास वेगाने वारे घेऊन वायव्येकडे वेगाने सरकत आहे. अशी माहिती हवामानशास्त्रज्ञ सॅम डुरान यांनी दिली आहे.

दरवर्षी 20 तीव्र वादळं

फिलीपिन्स दरवर्षी 20 तीव्र वादळांचा सामना करते. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये राय चक्रीवादळ फिलिपाइन्सला धडकले होते. ज्यात 208 लोकांचा मृत्यू झाला होते आणि सुमारे 4 लाख लोक बाधित झाले होते. तसेच, एप्रिल 2022 मध्ये वादळाने घातलेल्या धुमाकुळात 42 लोकांचा मृत्यू झाला असून 17 हजार लोक बेघर झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com