Philippines Ferry Fire Dainik Gomantak
ग्लोबल

Philippines Ferry Fire: फिलिपाइन्समध्ये मोठी दुर्घटना, बोटीला आग लागून 31 जणांचा होरपळून मृत्यू

Philippines Ferry Fire: मिळालेल्या माहितीनुसार, बोटीवर जवळपास 261 लोक होते, त्यापैकी 230 जणांना वाचवण्यात यश आले आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी गुरुवारी ही माहिती दिली.

Manish Jadhav

Philippines Ferry Fire: फिलिपाइन्समध्ये एका बोटीला आग लागून 31 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बोटीवर जवळपास 261 लोक होते, त्यापैकी 230 जणांना वाचवण्यात यश आले आहे. स्थानिक अधिकाऱ्यांनी गुरुवारी ही माहिती दिली.

आपत्ती व्यवस्थापन अधिकारी निक्सन अलोन्झो यांनी सांगितले की, लेडी मेरी जॉय 3 ही बोट बुधवारी झांबोआंगा शहरातून सुलू प्रांतातील जोलो द्विपाकडे चालली होती. दरम्यान, बोटीला अचानक आग लागली. या घटनेनंतर बोटीवरील अनेक प्रवाशांनी (Passengers) जीव वाचवण्यासाठी पाण्यात उड्या घेतल्या.

दरम्यान, फिलिपाइन्स कोस्ट गार्ड आणि मच्छिमारांसह बचाव कर्मचार्‍यांनी 195 प्रवासी आणि 35 क्रू मेंबर्सची सुटका केली. बेसिलानचे गव्हर्नर जिम सुलीमन यांनी सांगितले की, बोटीच्या प्राथमिक शोधात 18 मृतदेह सापडले आहेत. नंतर मृतांचा आकडा वाढला.

आगीच्या कारणाबाबत अद्याप स्पष्टता नाही

आग कशी लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. बासिलानचे गव्हर्नर म्हणाले की, वाचलेल्यांना झांबोआंगा आणि बासिलान येथे नेण्यात आले आहे, जिथे त्यांच्या त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.

तटरक्षक दलाने जारी केलेल्या फोटोमध्ये जळणारे जहाज दिसत आहे. जवळच, काही तटरक्षक लहान बोटीतून पाण्यात (Water) उडी मारलेल्या लोकांना बाहेर काढताना फोटोमध्ये दिसत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT