Pakistan Crisis Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan Crisis: महागाईविरोधात पाकिस्तानी जनता रस्त्यावर, TLP ने दिली देशव्यापी बंदची हाक

Pakistan Economic Crisis: महागाई, उपासमार आणि आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानातील जनता आता हैराण झाली आहे.

Manish Jadhav

Pakistan Economic Crisis: महागाई, उपासमार आणि आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या पाकिस्तानातील जनता आता हैराण झाली आहे. पाकिस्तानमध्ये अनेक महिन्यांपासून लोकांना पीठ, डाळी आणि तांदूळ यासाठी संघर्ष करावा लागत आहे. अशा स्थितीत जनतेने रस्त्यावर उतरण्याचा निर्धार केला आहे.

दरम्यान, गगनाला भिडणाऱ्या महागाईच्या (Inflation) विरोधात तहरीक-ए-लब्बेक पाकिस्तानने (टीएलपी) सोमवारी पाकिस्तानमध्ये देशव्यापी बंद पुकारला आहे. समा टीव्हीच्या वृत्तानुसार, कराची, लाहोर, फैसलाबाद, मंडी बहाउद्दीन, बहावलपूर आणि चिचवत्नीसह देशभरातील विविध शहरांमध्ये संप पाळला जात आहे.

दुसरीकडे, देशव्यापी संपामुळे पाकिस्तानातील (Pakistan) अनेक बाजारपेठा आणि पेट्रोल पंप बंद असल्याने जनतेची गैरसोय होत आहे. वाहतूक सेवा अंशत: ठप्प राहिल्याने प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानी पोहोचण्यात अडचणी आल्या.

TLP प्रमुख साद रिझवी यांनी दावा केला की, संपाच्या आवाहनाला देशाच्या कानाकोपऱ्यातून पाठिंबा मिळाला आहे. ते पुढे म्हणाले की, टीएलपी पाकिस्तानींच्या हक्कांसाठी आवाज उठवत आहे. जीवनावश्यक वस्तू आणि पेट्रोलियम उत्पादनांच्या गगनाला भिडलेल्या किमतींनी टीएलपीला संप पुकारण्यास भाग पाडले.

रिझवी पुढे असेही म्हणाले की, "वाढती महागाई, पेट्रोलियम पदार्थांच्या वाढत्या किमती आणि व्यापाऱ्यांचे होणारे आर्थिक नुकसान पाहता त्यांच्या संघटनेला रस्त्यावर यावे लागले.''

पाकिस्तान सरकारने इशारा दिला

टीएलपीने पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांना इशारा दिला की, सरकारने जर पेट्रोलियम उत्पादनांच्या किमती निर्धारित वेळेत मागे घेतल्या असत्या तर आज एवढे मोठे पाऊल उचलावे लागले नसते. गरीब आणि हीच सर्वात मोठी समस्या आहे,”

दुसरीकडे, पाकिस्तान घाऊक किराणा असोसिएशनचे अध्यक्ष अब्दुल रौफ इब्राहिम यांनी सांगितले की, कराचीच्या जोरा बाजारासह मुख्य बाजार आणि शेजारील बाजारपेठा बंद आहेत. भाववाढीविरोधात आंदोलनाला पाठिंबा देऊ, पण बाजार बंद करणार नाही, त्यामुळे आणखी नुकसान होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs AFG: 18 चौकार, 22 षटकार अन् 229 धावा! अभिषेक शर्मा ठरला T20 मालिकेचा 'किंग'; टीम इंडियाच्या युवा ब्रिगेडचा करिष्मा

खरी कुजबुज: भाजपचा शिस्तीचा बडगा कोसळला!

Agniveer Job News: अग्निवीरांसाठी मोदी सरकारचा मोठा दिलासा! 4 वर्षांचा कार्यकाळ संपताच हातात असणार दुसरी सरकारी नोकरी; काय आहे नेमका प्लॅन?

Porvorim Elevated Road: पर्वरी उन्नत मार्गावरील वाहतूक कोंडीचा गुंता सुटणार? रविवारी तज्ज्ञांची पाहणी; सोमवारी संयुक्त बैठकीत मोठा निर्णय

Horoscope 18 September 2026: शुक्रवारचा ग्रहांचा महासंयोग! 5 राशींना होणार अफाट आर्थिक फायदा; रखडलेली कामे चुटकीसरशी मार्गी लागणार

SCROLL FOR NEXT