Pakistan Economy Crisis: पाकिस्तानात मंत्र्यांना आता पगार नाही! पंतप्रधान शरीफ यांचा झटका

अलिशान कारचा वापर, 5 स्टार हॉटेलमध्ये राहणे, विमानाचे बिझनेस क्लास तिकीट या सुविधाही रद्द
Shahbaz Sharaf
Shahbaz SharafDainik Gomantak
Published on
Updated on

Pakistan Economy Crisis: पाकिस्तान दिवसेंदिवस आर्थिक गर्तेत जात आहे. त्यांच्याकडील परदेशी चलन साठा जवळपास संपुष्टात आला आहे. महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. येथील लोक मूलभूत गरजांसाठी तळमळत आहेत.

आणि जगात कुणीही कर्जासाठी पाकिस्तानला दारातही उभे करून घेत नाही आहे. आता या संकटावर मात करण्यासाठी पाकिस्तान सरकारने नवा मार्ग शोधला आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी सरकारी खर्चात मोठ्या प्रमाणात कपात करण्यासंदर्भात महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत.

Shahbaz Sharaf
Ajay Banga: पुण्यात जन्मलेले अजय बंगा बनणार जागतिक बँकेचे अध्यक्ष

पंतप्रधान शरीफ यांनी त्यांच्यासह इतर मंत्री पगार घेणार नाहीत, असे सांगितले आहे. याशिवाय पाकिस्तानी मंत्र्यांना यापुढे विमानाच्या बिझनेस क्लासमधून प्रवास करता येणार नाही, तसेच परदेशातील पंचतारांकित हॉटेलमध्ये राहता येणार नाही.

सरकारच्या काटेकोर उपायांचा भाग म्हणून फेडरल मंत्री, सल्लागार आणि सहाय्यकांना पगार आणि इतर फायदे मिळणार नाहीत, अशी घोषणा शरीफ यांनी केली आहे.

इस्लामाबादमध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना शरीफ म्हणाले की, ही काळाची गरज आहे. काळ आपल्याकडून काय मागणी करतो हे दाखवून द्यायचे आहे. हीच तपस्या, साधेपणा आणि त्याग आहे.

फेडरल मंत्र्यांना आता स्वतःची वीज, गॅस आणि पाण्याची बिले स्वतः भरावी लागतील. हे पाऊल खर्चात कपात करण्यासाठी आणि बजेट तूट कमी करण्याच्या सरकारच्या व्यापक प्रयत्नांचा एक भाग आहे.

Shahbaz Sharaf
रशियाला युक्रेन युद्ध जड जातेय? 1 वर्षात 9 ट्रिलियन डॉलर्स, 6300 रणगाडे, 300 लढाऊ विमाने नष्ट तरीही...

लक्झरी लाईफ न जगण्याचा सल्ला

पाकिस्तान सरकारने मंत्री आणि सल्लागारांना पगार न घेणे आणि परदेश दौऱ्यात पंचतारांकित हॉटेलमध्ये न राहणे अशा उपाययोजना जाहीर केल्या. यासोबतच त्यांना अनावश्यक खर्च टाळण्याचा सल्ला दिला आहे. बिझनेस क्लासच्या फ्लाइटमध्ये न चालण्याचा सल्ला दिला आहे.

सरकारी खर्चात कपात

यादरम्यान, पंतप्रधानांनी प्रत्येक सरकारी विभागाच्या चालू खर्चात एकूण 15 टक्के कपात करण्याची घोषणा केली आणि प्रांतांना त्याचे पालन करण्याचे आणि खर्चात कपात करण्याचे आवाहन केले. त्यांनी कॅबिनेट सदस्यांच्या आलिशान कारच्या वापरावर बंदी घातली आणि खर्च कमी करण्यासाठी इतर विविध उपाययोजना केल्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com