People in Israel have been protesting and demanding the government to bring back the citizens held hostage by Hamas:
पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासविरुद्ध इस्रायलचे युद्ध सुरूच आहे. दरम्यान, इस्रायलमधील लोकांनी निदर्शने करत हमासने ओलीस ठेवलेल्या नागरिकांना परत आणण्याची मागणी सरकारकडे केली आहे.
ओलिसांच्या सुटकेसाठी झालेल्या निदर्शनादरम्यान लोकांनी सांगितले की, आम्ही कोणाशीही संपर्क साधू शकत नाही, आम्ही नरकमय स्थितीत पोहोचलो आहोत.
आंदोलनादरम्यान, लोक म्हणाले, 'आमचा संपूर्ण संपर्क तुटला आहे, जगण्याची कोणतीही चिन्हे किंवा संकेत नाहीत. आता दोन आठवडे झाले आमच्या 200 हून अधिक लोकांना ओलीस ठेवले आहे आणि आम्ही आमचा आवाज सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी येथे आलो आहोत.
आंदोलकांनी सांगितले की, जगाने आणि आंतरराष्ट्रीय समुदायाने आम्हाला मदत करावी, जेणेकरून आम्ही आमच्या ओलीसांची सुटका करू शकू. त्यांना परत आणण्याची आमची मागणी आहे.
7 ऑक्टोबर रोजी हमासच्या हल्ल्यानंतर बेपत्ता झालेल्यांच्या कुटुंबीयांसह शेकडो आंदोलकांनी शनिवारी रात्री राजधानी तेल अवीवमध्ये निदर्शने केली.
हमासने ओलीस ठेवलेल्या त्यांच्या नातेवाइकांना परत आणण्यासाठी सरकारने तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी केली.
तर हमासने 7 ऑक्टोबर रोजी दक्षिण इस्रायलवर केलेल्या हल्ल्यादरम्यान सुमारे 200 लोकांना ओलीस ठेवल्याचे म्हटले आहे. 1973 च्या अरब-इस्रायल युद्धानंतर हा हमासचा सर्वात मोठा हल्ला होता, ज्यात शेकडो इस्रायली नागरिक मारले गेले.
इस्रायलने हमासच्या दहशतवाद्यांच्या हल्ल्याला 7 ऑक्टोबर रोजी गाझामध्ये बॉम्बफेक करून प्रत्युत्तर दिले, ज्यामध्ये 23 लाख पॅलेस्टिनींची घरे उद्ध्वस्त झाली. अत्यावश्यक पायाभूत सुविधांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आणि संपूर्ण गाझा ढिगाऱ्याखाली गेल्याचे दिसते.
पॅलेस्टाईनमधील वाढत्या मानवतावादी संकटादरम्यान, आरोग्य मंत्रालयाने आकडेवारी जाहीर केली आहे की, इस्रायली हल्ल्यांमध्ये आतापर्यंत 4,100 हून अधिक पॅलेस्टिनी ठार झाले आहेत. इस्रायलवर हमासच्या हल्ल्यातही हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे.
हमासच्या दहशतवाद्यांना पाठिंबा दिल्यानंतर इस्त्रायली लष्कराने लेबनॉनमधील काही दहशतवादी लक्ष्यांवर हवाई हल्लेही केले आहेत.
इस्रायली संरक्षण दलाने (IDF) दावा केला आहे की, त्यांनी लेबनॉनमधील दहशतवादी तळांना लक्ष्य केले आहे जे इस्रायली शहरावर क्षेपणास्त्र हल्ल्याची योजना आखत आहेत.
IDF च्या म्हणण्यानुसार, त्याने दक्षिण लेबनॉनमधील दहशतवादी तळावर हल्ला केला जो इस्रायलवर अँटी-टँक मार्गदर्शित क्षेपणास्त्र हल्ला करण्याची योजना आखत होता.
आयडीएफने इस्रायली लष्कराच्या हल्ल्याचा व्हिडिओही जारी केला आहे. खरं तर, 7 ऑक्टोबर रोजी इस्रायल-हमास युद्ध सुरू झाल्यापासून, इराण-समर्थित हिजबुल्लाह दहशतवादी गट उत्तर इस्रायल आणि इस्रायली शहरांमधील IDF तळांवर क्षेपणास्त्र हल्ले करत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.