pakistan 5.jpg 
ग्लोबल

पाकिस्तान दहशतवाद्यांना देतोय पेन्शन; भारताचा 'पाक' वर निशाणा

गोमंन्तक वृत्तसेवा

भारताने (india) दहशतवादाच्या (Terrorism) विषयावरुन पुन्हा एकदा पाकिस्तानावर (Pakistan) हल्लाबोल केला आहे. दहशतवादाला पाठिंबा देणे तसेच दहशतवाद्यांना मदत करण्यासाठी पाकिस्तानला जागतिक स्तरावर जबाबदार धरण्याची वेळ आल्याचे भारताने म्हटले आहे. बळाचा वापर करुन लोकांकडून हवं तसं वदवून घेणे, हत्या करणे आणि राजकीय कार्यकर्ते तसेच अल्पसंख्यांकाना (Minorities) वाटेल त्या पध्दतीने तुरुंगात डांबण्याच्या प्रकरणांचाही भारताने उल्लेख केला.  

जिनिव्हातील (Geneva) संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेमध्ये (Human Rights Council) मंगळवारी एका सत्रामध्ये भारताने जम्मू काश्मीरच्या(Jammu and Kashmir)मुद्द्यावरुन आणि वार्षिक अहवालासंदर्भात भाष्य करताना पाकिस्तानवर निशाणा साधला. संयुक्त राष्ट्र परिषदेमधील भारताच्या कायमस्वरुपी मोहिमेचे पहिले सचिव पवन कुमार बाधे यांनी भारताची भूमिका स्पष्ट केली. दहशतवाद मानवाधिकारांचे उल्लंघन करतो. दहशतवादाविरोधात कठोरपणे लढण्याची गरज आहे, असे पवन कुमार बाधे (Pawan Kumar Badhe) यांनी भूमिका मांडताना सांगितले. (Pension is given to terrorists in Pakistan India targets Pakistan) 

''आपल्या राष्ट्रीय धोरणांच्या नावाखाली पाकिस्तान धोकादायक आणि दहशतवादी घोषित करण्यात आलेल्यांना पेन्शन देतो. तसेच दहशतावाद्यांना पाकिस्तान आश्रय देतो. त्यामुळे आता पाकिस्तानला दहशतवाद्यांना सर्व प्रकारची मदत करणे आणि दहशतवाद वाढीसाठी जबाबदार ठरण्याची वेळ आली आहे,'' असे म्हणत पवन कुमार बाधे यांनी पाकिस्तानवर टीका केली. भारताने उत्तर देण्याच्या अधिकाराचा वापर करत आपली बाजू मांडली.

आम्ही पाकिस्तानमधील धार्मिक अल्पसंख्यांक समुदयामधील अल्पवयीन मुलींचे अपहरण, बलात्कार आणि जबरदस्तीने केलेले धर्मांतर तसेच लग्नाच्या बातम्या पाहिल्या आहेत. दरवर्षी पाकिस्तानमध्ये धार्मिक अल्पसंख्यांक समुदयामधील एक हजारहून अधिक मुलींचे जबरदस्तीने धर्मांतर केले जात असल्याचेही बाधे यांनी म्हटले आहे.

अहमदिया (Ahmadiyya), इसाई, शिख, हिंदुसहित इतर अल्पसंख्यांकाना कठोर अशा ईश्वर निंदेसदर्भात कायदे, जबरदस्तीने धर्मांतरण करणे आणि विवाह तसेच कायदेशीर न्यायव्यस्थेचीऐवजी समांतर न्यायव्यस्थेच्या माध्यमातून छळ करणे ही बाब पाकिस्तानात सामान्य समजली जाते. धार्मिक अल्पसंख्यांकाच्या पवित्र आणि प्राचीन स्थळांवर हल्ले करत त्यांची तोडफोड करण्याच्या घटनाही घडल्याचे भारताने संयुक्त राष्ट्रांच्या मंचावरुन म्हटलं आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa Live Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

Goa Tourism: परदेशी की भारतीय? कोणत्या पर्यटकांमुळे होतोय फायदा, व्यावसायिकांनी दिलेलं उत्तर वाचा

SCROLL FOR NEXT