Chandrayan 3 |Paul Golding Dainik Gomantak
ग्लोबल

Chandrayan 3 | आमचे 45 ट्रिलियन डॉलर लुटले त्याचे काय? चांद्रयान 3 च्या प्रक्षेपणानंतर खोडसाळपणा करणाऱ्या ब्रिटिश नेत्याला भारतीयांनी सुनावले

India Chandrayan Mission: यूकेच्या एका नेत्याने भारताच्या चांद्रयान मोहिमेचे उपरोधिक पद्धतीने अभिनंदन केले आहे. त्यानंतर भारतीयांनी त्यांना आठवण करून दिली की ब्रिटनने भारतातून लाखो कोटी लुटले होते.

Ashutosh Masgaunde

Paul Golding, leader of the Britain First Party, tweeted sarcastically, on Chandrayan 3: भारताने शुक्रवारी चांद्रयान-3 मोहीम सुरू केली. या मोहिमेअंतर्गत विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर चंद्रावर पाठवण्यात आले असून ते अनेक वैज्ञानिक प्रयोग करणार आहेत.

या मिशनसाठी जगभरातील देशांनी आणि लोकांनी भारताचे अभिनंदन केले आहे. पण असे काही लोक आहेत ज्यांना भारताची अंतराळातील प्रगती पचवता येत नाही.

एका ब्रिटीश नेत्यानेही असेच विधान केले आहे, यावरून ते आजही वसाहतवादी मानसिकतेतून बाहेर पडू शकलेले नाहीत, हे स्पष्ट होते. त्यांच्या दृष्टीने आजही भारत हा मागासलेला आणि गरीब देश आहे जो परकीय मदतीवर जगतो.

ब्रिटन फर्स्ट पार्टीचे नेते पॉल गोल्डिंग यांनी उपरोधिक ट्विट केले की, 'तुमच्या अंतराळ कार्यक्रमाच्या यशाबद्दल भारताचे अभिनंदन आणि ब्रिटनच्या राजकारण्यांची लाज वाटते जे विनाकारण भारताला लाखो पौंडांची परदेशी मदत देत आहेत.'

त्यांच्या या ट्विटवरून जणू काही भारतातील लोक ब्रिटनच्या देणग्यांवर जगत आहेत. त्यांच्या या वक्तव्यावर भारतीयांनी त्यांना चांगलेच सुनावले आहे.

एका व्यक्तीने लिहिले की, 'ब्रिटनने आजच्या किंमतीनुसार भारताकडून 45 ट्रिलियन डॉलर लुटले आहेत.'

भारताच्या लुटलेल्या वस्तू परत करा

ट्विटवर अनेकांनी म्हटले आहे की, भारत सरकारने ब्रिटनकडून मदत घेणे बंद केले आहे. परदेशातून जी काही मदत येते ती भारतातील स्वयंसेवी संस्थांना जाते.

त्याच वेळी, ब्रिटनचे संग्रहालय भारतातून लुटलेल्या वस्तूंनी भरलेले असल्याची आठवण अनेकांनी करून दिली.

कोहिनूर हिराही ब्रिटीश म्युझियममध्ये ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. अनेकांनी मदत देण्याऐवजी भारताच्या वस्तू परत करा, असे सांगितले.

शँक्स नावाच्या युजरने लिहिले की, जी काही मदत केली जाते ती यूकेच्या राजकीय हितासाठी आहे.

ब्रिटिश धर्मादाय सत्य काय?

ब्रिटनमधील अनेक नेत्यांनी भारताचा अवमान करण्यासाठी यापूर्वीही दानधर्माचा उल्लेख केला होता. यावर 2012 साली तत्कालीन अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी पाश्चात्य देशांना मदतीबाबत सुनावले होते.

रिपोर्टनुसार, प्रणव मुखर्जी म्हणाले होते की, भारताला ब्रिटीशांच्या दानाची गरज नाही. त्यांच्या मते हे उंटाच्या तोंडातल्या जिऱ्यासारखे आहे. ते म्हणाले होते, 'आम्हाला त्याची गरज नाही. आपल्या सर्वांगीण विकासाच्या खर्चात हे उंटाच्या तोंडात जिरे आल्यासारखे आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Konkan Railway: शाळेच्या गणवेशात घरातून पळाला, बेपत्ता मुलगा रत्नागिरीत सापडला; 'मत्स्यगंधा एक्स्प्रेस'चा टीसी ठरला देवदूत

Asia Cup Rising Stars 2025: भारताचे फायनलचे स्वप्न भंगले, सुपर ओव्हरमध्ये बांगलादेशने मारली बाजी; भारतीय खेळाडूंनी केली निराशा VIDEO

Goa History: कुशावती गाळाने भरली, गोव्यातील कदंब राजकर्त्यांनी चांदोर येथून जुवारी नदीकिनारी राजधानी नेली..

Tejas Fighter Jet Crash: दुबई एअर शोमध्ये 'तेजस' लढाऊ विमान कोसळले; दुर्घटनेत वैमानिकाचा दुर्देवी मृत्यू

AUS vs ENG 1st Test: ॲशेसमध्ये 100 वर्षांतील सर्वात मोठा रेकॉर्ड! स्टार्क-स्टोक्सच्या माऱ्यापुढे फलंदाज ढेपाळले; पहिल्याच दिवशी 19 विकेट्स VIDEO

SCROLL FOR NEXT