Most Powerful Passport  Dainik Gomantak
ग्लोबल

Passport Ranking: या आशियाई देशाचा पासपोर्ट सर्वात शक्तिशाली, जाणून भारताचे स्थान

Most Powerful Passport: जगभरातील विविध देशांच्या पासपोर्टची नवीन रॅकिंग जाहीर करण्यात आली आहे.

दैनिक गोमन्तक

Passport Ranking: जगभरातील विविध देशांच्या पासपोर्टची नवीन रॅकिंग जाहीर करण्यात आली आहे. हेन्ली पासपोर्ट इंडेक्समध्ये जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट आहेत. या निर्देशांकानुसार जपानचा पासपोर्ट हा जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट आहे. यानंतर सिंगापूर आणि दक्षिण कोरियाच्या पासपोर्टला स्थान देण्यात आले आहे.

दरम्यान, हेन्ली पासपोर्ट इंडेक्सनुसार जर्मनी आणि स्पेनचे पासपोर्ट तिसऱ्या क्रमांकावर आहेत. तर चौथ्या क्रमांकावर फिनलंड, इटली आणि लक्झेंबर्ग, पाचव्या क्रमांकावर ऑस्ट्रिया आणि डेन्मार्कचे पासपोर्ट आहेत. हेन्ली पासपोर्ट इंडेक्सनुसार, जर एखाद्या प्रवाशाकडे जपानी पासपोर्ट असेल तर तो 193 देशांमध्ये कोणत्याही त्रासाशिवाय प्रवास करु शकतो. या बाबतीत सिंगापूर आणि दक्षिण कोरिया थोडे मागे आहेत.

अमेरिका 7 व्या क्रमांकावर आहे, 186 देशांना प्रवेशाची परवानगी

इंग्लंडचा पासपोर्ट सहाव्या क्रमांकावर आहे, ज्यावरुन 187 देशांचा प्रवास करता येतो. अमेरिका 7 व्या स्थानावर आहे. यूएस पासपोर्ट 186 देशांमध्ये प्रवास करण्याची परवानगी आहे. रशियन पासपोर्ट 50 व्या क्रमांकावर आहे. रशियन पासपोर्ट 119 देशांमध्ये प्रवास करण्यास परवानगी देतो. त्याचबरोबर चीन 80 देशांमध्ये पोहोचून 69 व्या क्रमांकावर आहे. एकूण 199 देशांच्या यादीत भारताचा (India) पासपोर्ट 87 व्या क्रमांकावर आहे. भारतीय पासपोर्टधारक 60 देशांमध्ये पूर्व व्हिसाशिवाय प्रवास करु शकतात. त्याचबरोबर भारताचा शेजारी देश पाकिस्तानचा (Pakistan) पासपोर्ट 109 व्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानी पासपोर्टधारक व्हिसाशिवाय जगातील 32 देशांना भेट देऊ शकतात.

अफगाणिस्तान पासपोर्ट 27 देशांमध्ये थेट प्रवास करण्यास परवानगी देतो

अफगाणिस्तानचा (Afghanistan) पासपोर्ट सर्वात कमी उपयुक्त आहे, ज्यामुळे केवळ 27 देशांमध्ये थेट प्रवास करता येतो.

दुसरीकडे, हा निर्देशांक 17 वर्षातील डेटा एकत्र करुन तयार केला जातो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Live: मुख्यमंत्र्य‍ांनी सभापतींना डोळे मारणे बंद करावे!

Goa Education: ABC म्हणजे 'रोमन कोकणी' नव्हे, देवनागरी कोकणीतून शाळा सुरू करण्यास सरकार देणार मदत; मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट

'किमान मुख्यमंत्री, आमदाराला फोन करुन चौकशी करा, कोणालाही पैसे पाठवू नका'; मुख्यमंत्र्यांचे गोमंतकीयांना आवाहन

Power Outages in Goa: गोव्‍यात दिवसाला 37 वेळा वीजपुरवठा खंडित, पहा Video

Moths: फुलपाखरांसारखे दिवसा दिसत नसले तरी, रात्री बाहेर पडणाऱ्या 'पतंगांचे' स्थान महत्वाचे आहे..

SCROLL FOR NEXT