Saudi Arabia Floating City: आखाती देशांनी नेहमीच गगनचुंबी इमारती बांधून जगाला चकित केले आहे. आता समुद्रात देखील एक महाकाय शहर उभारण्याची तयारी सुरू आहे, या शहरात तब्बल 65,000 लोकांना राहता येणार आहे. सौदी अरेबियाने पँगोज नावाचे 5 अब्ज डॉलरचे, टेरा याच तयार करण्याची घोषणा केली आहे. हे शहर तयार करण्यासाठी $8 अब्ज (65,000 कोटी रुपये) खर्च येणार आहे. कासवाच्या आकाराच्या या तरंगत्या शहराला 'पायगिया' असे नाव देण्यात आले आहे.
(Pangeos: Saudi Arabia’s $8bn Turtle-shaped Floating City)
काय आहेत या शहराची वैशिष्ट्ये?
- 'पायगिया' शहरात 64 अपार्टमेंट आणि 19 व्हिला असतील.
- शहराचा आकार कासवासारखा असेल आणि प्रत्येक पंखावर राहण्यासाठी घरे बांधली जाणार आहेत. हे तयार होण्यासाठी 8 वर्षे लागू शकतात.
- या तरंगत्या शहरात शॉपिंग मॉल्स, लहान जहाजांसाठी बंदर आणि प्रवाशांच्या वाहतूकीसाठी विमानसेवा देखील असेल. हॉटेल्स आणि पार्क्ससारख्या सुविधाही असतील.
- शहर पूर्ण झाल्यानंतर ही जगातील सर्वात मोठी तरंगणारी रचना असेल.
- सौदी अरेबियाच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या माध्यमातून लोकांना समुद्रात राहण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. शहरात 65,000 लोक राहू शकतात.
- शहराच्या बांधकामाची प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी सुमारे 1 चौरस किलोमीटरमध्ये वर्तुळाकार धरण बांधले जाणार असल्याची माहिती आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.