Humaira Asghar Dainik Gomantak
ग्लोबल

जळत्या जंगलात व्हिडीओ करणं पडलं महागात; पाकिस्तानी टिकटॉकर वादाच्या भोवऱ्यात

हुमिराचा टिकटॉक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

दैनिक गोमन्तक

टिकटॉकने अनेक लोकांना रातोरात स्टार बनवले आहे. पाकिस्तानी सोशल मीडिया स्टार हुमैरा असगर तिच्या एका टिकटॉक व्हिडिओमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. हुमैराने टिकटॉकवर स्वतःचा एक व्हिडिओ शेयर केला आहे ज्यामध्ये तिच्या मागचे जंगल जळत आहे. (Pakistani tiktoker Humaira Asghar faces criticism over her photoshoot in burning jungle)

हा व्हिडिओ पाकिस्तानमधील लोकप्रिय गाणे पसुरीवर बनवण्यात आला आहे. हुमैराचा हा व्हिडिओ जंगलात शूट करण्यात आला असून व्हिडिओमध्ये तिच्या मागे असलेल्या जंगलातील झाडांना आग लागल्याचे दिसत आहे. जंगलातील तिचा नाट्यमय व्हिडिओ शेयर करत हुमैराने कॅप्शनमध्ये लिहिले "मी जिथे आहे तिथे आग आहे." हुमिराचा टिकटॉक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

15 सेकंदाचा व्हिडिओ बनवण्यासाठी हुमैराने जंगलातील झाडांना आग लावल्याचे बोलले जात आहे. असा दावा करणारे अनेक लोक तिला शिक्षा देण्याची मागणीही पाकिस्तान सरकारकडे करत आहेत. व्हिडिओवरून वाद आणि ट्रोल झाल्यानंतर हुमिराच्या टीमकडून एक निवेदन जारी करण्यात आले आहे, ज्यामध्ये हुमैराने आग लावली नाही आणि व्हिडिओ बनवताना कोणतीही हानी झाली नसल्याचे म्हटले आहे. ट्रोल झाल्यानंतर हुमिराने व्हिडिओ काढून टाकला आहे. पण तरीही त्याच्या व्हिडीओवरून वाद पेटला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT