ग्लोबल

Pakistan News: पाकिस्तानी कलाकारने सादर केले भारतीय राष्ट्रगीत video

गोमन्तक डिजिटल टीम

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशात साजरा केला जात आहे. भारतीय स्वातंत्र्याची 75 वर्षे साजरी करत असताना देशात वेगळा उत्साह पहायला मिळत आहे. तसेच, देशाबाहेर असणारे भारतीय देखील आपले देश प्रेम दाखवत आहेत. दरम्यान, एका पाकिस्तानी कलाकाराने (Pakistani Artist) भारतीय राष्ट्रगीत (India's National Anthem) सादर केले असे जर तुम्हाला सागितले तर धक्का बसेल. पण, हे खरे आहे. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त एका पाकिस्तानी कलाकाराने भारतीय राष्ट्रगीत सादर केले असून, त्याचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे.

सियाल खान (Siyal Khan) असे या कलाकाराचे नाव आहे, सियाल रबाब (Rabab) हे वाद्य वाजवतो. भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त सियाल खानने रबाब वरती भारतीय राष्ट्रगीत 'जण गण मन' सादर केले आहे. याचा व्हिडिओ सियाल याने ट्विटरवरती शेअर केला आहे. 'सीमापार असलेल्या चाहत्यांसाठी भेट. भारतीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा. मैत्री आणि शांततेचे प्रतिक म्हणून मी भारतीय राष्ट्रगीत सादर करत आहे. दोन्ही देशांमध्ये उत्तम संबधाची मी कामना करतो.' असे सियाल खान याने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

सियाल खान याच्या व्हिडिओला हजारो व्हिव्हज मिळाल्या असून, अनेकांनी कमेंट देखील केली आहे. दरम्यान, भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या एक दिवस अगोदर म्हणजेच, 14 ऑगस्ट रोजी पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन असतो. यावेळी देखील सियाल खान याने पाकिस्तानी राष्ट्रगीत सादर केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran-USA War: "युद्ध कधी संपवायचं हे अमेरिका नाही, आम्ही ठरवू'' ट्रम्प यांच्या वक्तव्यावर इराणचा संतप्त इशारा; तेलपुरवठा रोखण्याचीही दिली धमकी

Goan Migration: 5 वर्षांत 'इतक्या' गोमंतकीयांकडून भारतीय नागरिकत्‍वाचा त्‍याग; 99 % लोकांनी निवडले 'पोर्तुगाल'

Gautam Gambhir: "टीका करा, मी पर्वा करत नाही"! सोशल मीडिया ट्रोलिंगवरून गंभीरचे रोखठोक मत; बांधिलकी संघाशी असल्याचे प्रतिपादन

Amit Patkar: वाढदिनी पाटकर धरणे आंदोलनात! मिराबागवासीयांना दिला पाठिंबा; राज्य सरकारवर केली टीका

Mirabag: '..आमचा संगमेश्वर कायमचाच पाण्याखाली जाईल'! मीराबाग बंधाऱ्याला सांगेवासीयांचाही विरोध; सरकारला दिला इशारा

SCROLL FOR NEXT