Hafiz Saeed Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan Election Results: पाकिस्तानी जनतेने दहशतवादाला नाकारले; हाफिज सईदच्या लेकाचा निवडणुकीत पराभव

Hafiz Saeed: पाकिस्तानमध्ये निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. इम्रान खान तुरुंगातूनच नवाझ शरीफ यांच्या पक्षाला टक्कर देत आहेत.

Manish Jadhav

Pakistan Election Results:

पाकिस्तानमध्ये निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. इम्रान खान तुरुंगातूनच नवाझ शरीफ यांच्या पक्षाला टक्कर देत आहेत. इम्रान यांचे उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. इम्रान यांच्या पक्षानेही केंद्रात सरकार स्थापनेचा दावा केला आहे. मात्र, पीएमएलएन-नवाज आघाडीवर आहे. दरम्यान, दहशतवादी हाफिज सईदचा (Hafiz Saeed) मुलगा तल्हा सईद लाहोर NA-122 या जागेवरुन निवडणूक पराभूत झाल्याची बातमी आहे. तल्हाला अत्यंत वाईट पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्याला केवळ 2042 मते मिळाली आहेत.

दरम्यान, पाकिस्तानचे माजी पंतप्रधान लतीफ खोसा यांनी त्याचा पराभव केला आहे. खोसा हे एक लाखांहून अधिक मतांनी विजयी झाले आहेत. तल्हा सईद हा हाफिज सईदचा उत्तराधिकारी मानला जातो. दहशतीचे साम्राज्य पसरवण्यात तल्हा त्याच्या वडिलांसोबत सामील आहे. भारत सरकारनेही तल्हाला दहशतवादी घोषित केले आहे. भारतात झालेल्या अनेक हल्ल्यांमागे तल्हाचा हात असल्याचं सांगण्यात येत आहे.

दुसरीकडे, दहशतवादासाठी निधी गोळा केल्याप्रकरणी तल्हा सईदचे नावही पुढे आले आहे. पाकिस्तानात (Pakistan) त्याच्या निवडणूक लढवण्यास विरोध झाला होता. मात्र, तल्हाने निवडणूक लढवली. इम्रान खानही याच जागेवरुन निवडणूक लढवणार असल्याचे यापूर्वी सांगितले जात होते. मात्र, न्यायालयाने त्यांना निवडणूक लढवण्यास बंदी घातली. तीन प्रकरणांमध्ये अटक आणि शिक्षा झाल्यामुळे इम्रान खान निवडणूक लढवू शकले नाहीत. नवाझ शरीफ देखील दोन जागांवरुन निवडणूक लढवत होते. त्यांना केवळ एका जागेवर विजय मिळाला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Single Women: एकल महिलांना दया नव्हे, सन्मानाची गरज

AI Deepfake Content: डीपफेकच्या वाढत्या धोक्याविरोधात मोदी सरकार आक्रमक; सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्ससाठी नियम अत्यंत कडक

The Taxation Bill 2026: फ्री UPI पेमेंटचे दिवस आता संपणार? लोकसभेत गदारोळात नवीन टॅक्स बिल संमत; सामान्य नागरिकांच्या खिशावर होणार परिणाम?

दारुची नशा अन् एआयचा किळसवाणा खेळ! चालत्या ट्रेनमध्ये ChatGPT वर बुरखाधारी महिलेचा बनवला आक्षेपार्ह फोटो; भामटा पोलिसांच्या कचाट्यात VIDEO

Usha Nadkarni: पतीशी कोणतंही नातं नाही, मुलगा आई मानत नाही... 80 व्या वर्षीही एकट्याच आयुष्य जगतात उषा नाडकर्णी, वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT