Pakistani MP Afnan Ullah Khan has caused controversy by posting a photo and lines justifying Hitler's actions in the context of recent Israeli attacks. Dainik Gomantak
ग्लोबल

"जगाला आतातरी कळाले असेल त्याने असे का केले," पाकिस्तानी खासदाराच्या ट्विटमुळे जगभरात गदारोळ

ऑक्सफर्ड, यॉर्क आणि युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन (UCL) सारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये शिक्षण घेतलेले Pakistani MP Afnan Ullah Khan यांनी अलीकडच्या इस्रायली हल्ल्यांच्या संदर्भात हिटलरच्या कृतींचे समर्थन करणारे ट्विट केले होते.

Ashutosh Masgaunde

Pakistani MP Afnan Ullah Khan has caused controversy by posting a photo and lines justifying Hitler's actions in the context of recent Israeli attacks:

ऑक्सफर्ड, यॉर्क आणि युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन (UCL) सारख्या प्रतिष्ठित संस्थांमध्ये शिक्षण घेतलेले पाकिस्तानी खासदार अफनान उल्ला खान यांनी अलीकडच्या इस्रायली हल्ल्यांच्या संदर्भात हिटलरच्या कृतींचे समर्थन करणाऱ्या ओळी आणि हिटलरचा फोटो पोस्ट करून वाद निर्माण केला आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वी Twitter) वर शेअर केलेली पोस्ट, प्लॅटफॉर्मच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याबद्दल त्वरीत काढून टाकण्यात आली. मात्र, या पोस्टमुळे जगभरातील अनेकांनी यावर टीका केली आहे.

हिटलरला त्याच्या नाझी गणवेशात दाखवलेल्या वादग्रस्त पोस्टमध्ये होलोकॉस्टचा उल्लेख होता, जिथे साठ लाख ज्यूंचा नरसंहार झाला होता.

खान यांनी हिटलरचा फोटो पोस्ट करत, "जगाला आतातरी कळाले असेल त्याने असे का केले," असे कॅप्शन दिले होते. तसेत #GazaGenocide असा हॅशटॅगही वापरला होता.

या पोस्टनंतर पॅलेस्टाईनचे समर्थन करणाऱ्यांसह अनेक यूजर्सनी पोस्टवर जोरदार टीका केली. यावेळी एका यूजरने एक्सकडे पोस्ट तात्काळ काढून टाकण्याची मागीणी केली. तसेच पाकिस्तानी खासदाराचा निषेधही केला.

दुसर्‍या यूजरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सचे मालक इलॉन मस्क यांना टॅग केले, आणि प्लॅटफॉर्मवर बेजबाबदारपणाचा आरोप केला.

Afnan Ullah Khan

खान यांच्या लिंक्डइन प्रोफाइलमध्ये उल्लेख आहे की, ते 11 मार्च 2021 रोजी पाकिस्तानमधील सर्वात तरुण खासदार बनले आहेत.

ते आयटी आणि दूरसंचार, विज्ञान आणि तंत्रज्ञान, विमान वाहतूक, गृहनिर्माण आणि कामे आणि पेट्रोलियमसाठी संसदेच्या स्थायी समित्यांमध्ये सक्रियपणे सहभागी आहेत. याव्यतिरिक्त, ते संसदेच्या राष्ट्रीय वारसा आणि संस्कृती समितीचे अध्यक्ष आहेत.

दरम्यान, इस्रायलकडून उत्तर गाझामध्ये सोमवारी पहाटे तीव्र हवाई आणि बॉम्ब हल्ले झाल्याची माहिती मिळाली. इस्रायली सैन्याने, टॅंक्सद्वारे जमिनीवर हल्ला सुरू केला, ज्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर हालचाली वाढल्या आहेत.

गाझा शहरातील शिफा आणि अल-कुड्स रुग्णालयाजवळील भागात इस्रायली हवाई हल्ले झाले. याव्यतिरिक्त, पॅलेस्टिनी मीडियाने एन्क्लेव्हच्या दक्षिणेकडील भागात असलेल्या खान युनिस शहराजवळ पॅलेस्टिनी अतिरेकी आणि इस्रायली सैन्यांमधील संघर्ष समोर आला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cash For Job Scam: मंत्री, आमदारांचे कॉल रेकॉर्ड तपासा; सरकारी नोकरी घोटाळ्याप्रकरणी 'आप'ने सत्ताधाऱ्यांनाच घेरले

Cash For Job Scam: वकिलांनाही पूजानं घातला लाखोंचा गंडा; मामलेदाराच्या नोकरीचं दिलं आमिष

Goa News Updates: कळंगुटमध्ये एफडीएची धडक कारवाई, निकृष्ट काजू जप्त; वाचा दिवसभरातील घडामोडी

Vibrant Goa Summit 2024 ला मुख्यमंत्र्यांची हजेरी; पर्यटनाव्यतिरिक्त इतर व्यवसायांवर लक्ष केंद्रित करण्याचा मानस

'Heritage First Festival' मध्ये पदभ्रमण आणि कार्यशाळांची मेजवानी! सहभागी होण्यासाठी 'क्लिक' करा इथे

SCROLL FOR NEXT