Viral Video: अखेर संयम सुटला, तहान आणि भुकेने व्याकूळलेल्या लोकांचा UNच्या धान्य गोदामांवर हल्ला

Israel Hamas War: इस्रायलच्या बॉम्बहल्ल्यांमुळे अनेक सुविधा ठप्प झाल्या आहेत. लोक मोठ्या प्रमाणात स्थलांतरित होत आहेत. मात्र जे उरले आहेत ते अन्न, पाण्यासाठी तडफडत आहेत.
Israel Hamas war, Thirsty and hungry Gazans attack UN grain warehouses.
Israel Hamas war, Thirsty and hungry Gazans attack UN grain warehouses.Dainik Gomantak
Published on
Updated on

Israel Hamas war, Thirsty and hungry Gazans attack UN grain warehouses:

इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध सुरू होऊन 22 दिवस उलटले आहेत. आज युद्धाचा 23 वा दिवस आहे.

युद्धामुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झालेल्या गाझातील लोकांचे जीवन नरकमय झाले आहे. यामुळे तहान आणि भुकेने व्याकूळलेल्या लोकांचा संयम सुटत आहे.

यूएन एजन्सीने सांगितले की, गाझामधील हजारो लोकांनी रेशन आणि जिवनावश्यक वस्तूंसाठी गाझामधील यूएन गोदामावर हल्ला करत जे हाताला लागेल ते घेऊन गेले.

एजन्सीने म्हटले आहे की, युद्धामुळे लोक निराश झाले आहेत. तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या युद्धामुळे अशी दृश्ये निर्माण झाल्याचे एजन्सीने म्हटले आहे.

7 ऑक्टोबरला हमासने इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर गाझा पट्टीतील परिस्थिती बिकट झाली आहे. पॅलेस्टिनी निर्वासितांबाबत, यूएन एजन्सीने सांगितले की हजारो लोकांनी अन्न आणि आवश्यक वस्तूंसाठी गाझातील यूएन च्या गोदामांवर हल्ला केला आहे.

पॅलेस्टिनी निर्वासितांसाठी यूएन एजन्सीचे संचालक थॉमस व्हाईट म्हणाले की, लोक ज्या प्रकारे धान्य गोदामांमध्ये घुसले आहेत ते चिंताजनक आहे.

Israel Hamas war, Thirsty and hungry Gazans attack UN grain warehouses.
"जनतेला तो अधिकार नाही," Electoral Bonds बाबत मोदी सरकारने सुप्रीम कोर्टात मांडली बाजू

इस्रायली सैन्याने जमिनीच्या मार्गाने उत्तर इस्रायलमधून गाझामध्ये प्रवेश केला आहे. इस्रायल सतत बॉम्बफेक करून हमासच्या तळांना भग्नावस्थेत बदलत आहे.

अनेक लोक वीज आणि औषधांवर अवलंबून आहेत. इस्रायलच्या बॉम्बहल्ल्यांमुळे लोक मोठ्या प्रमाणात स्थलांतरित होत आहेत. मात्र जे उरले आहेत ते वीजपुरवठा खंडित झाल्याने अंधारात जगत आहेत.

Israel Hamas war, Thirsty and hungry Gazans attack UN grain warehouses.
Watch Video: ब्राझीलच्या ॲमेझॉन जंगलात विमान कोसळले, 12 जणांचा मृत्यू!

हमासच्या प्राणघातक हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायल पॅलेस्टाईनमधील गाझामध्ये बॉम्बफेक करत आहे. गाझाची सर्व बाजूंनी नाकेबंदी करण्यात आली आहे.

इजिप्तच्या सीमेवरून फक्त काही पुरवठा गाझापर्यंत पोहोचत आहे. UNRWA इजिप्तमधून गाझामध्ये प्रवेश करणाऱ्या मानवतावादी ताफ्यांसाठी देर अल-बालाह येथील गोदामांपैकी एकामध्ये पुरवठा साठवत आहे. येथून ते लोकांमध्ये वितरित केले जात आहे.

UNRWA ने म्हटले आहे की, इस्त्रायली हवाई हल्ल्यांमुळे गाझामधील लोकांना मदत करण्याची क्षमता गंभीरपणे बाधित झाली आहे. या हल्ल्यात 59 कर्मचारी मारले गेले आहेत. त्यामुळे ते लोकांना इच्छा असूनही पूर्ण मदत करू शकत नाहीत.

UNRWA वेस्ट बँक, जॉर्डन, सीरिया आणि लेबनॉनमध्ये शाळा, वैद्यकीय आणि इतर मानवतावादी मदत देण्याचे काम करते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com