Bilawal Bhutto Dainik Gomantak
ग्लोबल

Bilawal Bhutto: अमेरिका दौऱ्यावर असलेले पाकिस्तानचे परराष्ट्र म्हणाले, मी गाढवासारखा...

परदेश दौऱ्यांवर विरोधकांकडुनच प्रश्नचिन्ह

Akshay Nirmale

Bilawal Bhutto: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो झरदारी भारताच्या निशाण्यावर आहेत. दरम्यान, बिलावल भुट्टो यांनी स्वतःची तुलना गाढवाशी केली आहे. भुट्टो हे सतत परदेश दौऱ्यावर असतात, सध्या ते अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले आहेत. त्यावरून ते पाकिस्तानातील विरोधकांच्या निशाण्यावर आला आहे.

दरम्यान, परदेश दौऱ्यांवरील आरोपांबाबत भुट्टो यांनी वॉशिंग्टन डीसी येथील पाकिस्तान दूतावासाच्या वतीने पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले आहे.

पाकिस्तान पीपल्स पार्टीने ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो म्हणत आहेत की, ते स्वतःचे तिकीट स्वतः खरेदी करतात, हॉटेलचे बिल स्वत: भरतात आणि कुठल्याही प्रकारे या दौऱ्यातील खर्चाचा बोजा पाकिस्तानच्या लोकांवर पडत नाही. या सहलींवर ते "गाढवासारखे" काम करत आहेत. आपल्या दौऱ्यांबाबत प्रसारमाध्यमांद्वारे असत्य पसरवले जात आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.

खरे तर, परराष्ट्र मंत्री म्हणून मी या खर्चाचा हक्कदार आहे, पण मला या दौऱ्यांचा फायदा झाला नाही, तर पाकिस्तानच्या जनतेला या भेटींचा फायदा झाला आहे. ही माझी मेहनत आहे. इतर लोक परदेशात जातात तेव्हा ते सुट्टीवर जातात. हे लोक मला गाढवासारखे काम करायला लावू इच्छितात, असेही भुट्टो यांनी म्हटले आहे.

काही दिवसांपूर्वी बिलावल भुट्टो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल असभ्य भाषा वापरत ओसामा बिन लादेन मारला गेला, पण गुजरातचा कसाई जिवंत असल्याचे म्हटले होते. यावर भारतानेही तीव्र प्रतिक्रिया दिली. त्यानंतरही त्यांनी स्वतःच्या वक्तव्याचे समर्थन करत भारतातील मुस्लिमांना जे वाटते तेच मी बोललो, असे म्हटले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT