Charles Shobhraj: कुख्यात बिकिनी किलर शोभराजची फ्रान्सला रवानगी

Charles Shobhraj: कुख्यात बिकिनी किलर चार्ल्स शोभराज याला कतार एअरवेजच्या विमानातून फ्रान्सला पाठवले जात आहे.
Charles Shobhraj
Charles ShobhrajDainik Gomantak a
Published on
Updated on

Charles Shobhraj: कुख्यात बिकिनी किलर चार्ल्स शोभराज याला कतार एअरवेजच्या विमानातून फ्रान्सला पाठवले जात आहे. चार्ल्स शोभराज याची शुक्रवारीच नेपाळमधील तुरुंगातून सुटका झाली असून आता त्याची रवानगी फ्रान्सला करण्यात आली आहे. 1970 च्या दशकात चार्ल्स शोभराजने आशियातील अनेक देशांमध्ये खुनासह अनेक गंभीर गुन्हे केले होते. चार्ल्स शोभराजची नेपाळमधील तुरुंगातून सुटका झाल्यानंतर काही तासांनी त्याला त्रिभुवन विमानतळावर नेण्यात आले. भारतीय आणि व्हिएतनामी पालकांचे मूल असलेल्या चार्ल्स शोभराजकडे फक्त फ्रेंच नागरिकत्व आहे.

दरम्यान, चार्ल्स शोभराजचे (Charles Shobhraj) वकील गोपाल शिवकोटी चिंतन यांनी सांगितले की, त्याला फ्रान्सला पाठवण्यासाठी त्रिभुवन विमानतळावर नेण्यात येत आहे. चार्ल्स शोभराज याला कतार एअरवेजच्या विमानाने फ्रान्सला (France) पाठवले जात आहे. प्रथम त्याला कतारमधील दोहा येथे नेले जाईल आणि नंतर तेथून त्याला पॅरिसला दुसऱ्या विमानाने पाठवले जाईल.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, चार्ल्स शोभराज याला आयुष्यभर नेपाळमध्ये (Nepal) येण्यास बंदी घालण्यात आली आहे. सरकारी अधिकाऱ्यांचा हवाला देत 'ऑनलाइन खबर'ने आपल्या वृत्तात म्हटले आहे की, चार्ल्स शोभराज याला आता नेपाळमध्ये येण्यापासून रोखले जाईल.

Charles Shobhraj
Charles Sobhraj: बिकिनी किलर चार्ल्सची रंगीन लव्हस्टोरी

दुसरीकडे, शोभराजने नेपाळमधील गंगालाल रुग्णालयात दाखल करण्याची मागणी केली होती. उपचारासाठी 10 दिवस अॅडमिट राहायचे असल्याचे त्याने सांगितले. 2017 मध्ये याच रुग्णालयात त्याच्यावर हृदय शस्त्रक्रियाही झाली होती. बुधवारीच नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयाने चार्ल्स शोभराज यांची तुरुंगातून सुटका करण्याचे आदेश दिले होते. याशिवाय न्यायालयाने त्याला 15 दिवसांत फ्रान्सला पाठवण्यास सांगितले होते. कोर्टाने सांगितले की, त्याच्यावर आणखी काही गुन्हा दाखल असेल तर तो इथेच थांबवता येईल.

Charles Shobhraj
Charles Sobhraj: बिकनी किलर म्हणून ओळख असलेला चार्ल्स शोभराज कोण आहे!

चार्ल्स शोभराज याने तुरुंगात 95 टक्के शिक्षा पूर्ण केली होती.

न्यायमूर्ती सपना प्रधान मल्ला आणि तिल प्रसाद श्रेष्ठ यांच्या खंडपीठाने चार्ल्स शोभराज याची सुटका करावी, असे म्हटले होते. त्याने 95 टक्के शिक्षा तुरुंगात भोगली आहे. मात्र, पेपर प्रक्रिया पूर्ण होऊ न शकल्याने कारागृह प्रशासनाने गुरुवारी त्याची सुटका केली नाही. यानंतर शुक्रवारी त्याला तुरुंगातून बाहेर काढून थेट फ्रान्सला पाठवण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com