भारतीय पायलट अभिनंदन वर्धमान यांना पकडण्याचा दावा करणारा पाकिस्तानी मेजर मोईज अब्बास शाह चकमकीत ठार झाला आहे. तरहरीक ए तालिबान दहशतवादी संघटनेसोबत खैबर पख्तूनख्वा भागात झालेल्या चकमकीत दोन पाकिस्तानी अधिकारी ठार झाले यात शाहचा देखील समावेश आहे. भारताने पाकिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यात २०१९ साली पायलट अभिनंदन वर्धमान यांना पकडण्याचा दावा मेजर मोईज अब्बास शाह याने केला होता.
खैबर पख्तूनख्वा भागात झालेल्या चकमकीत ११ दहशतवादी ठार झाले, अशी माहिती पाकिस्तानी सैन्याच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आली आहे. यासोबत दोन पाक सैन्यातील जवानांचा देखील मृत्यू झाल्याचे या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
ख्वारीज येथे पाकिस्तानी सैन्य आणि टीटीपीच्या दहशतवाद्यांसोबत चकमक झाली. यात भारतीय पुरस्कृत ११ दहशतवादी ठार झाले आणि सातजण गंभीर जखमी झाले. अशी माहिती पाकिस्तानी सैन्याच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दाखल खैबर पख्तूनख्वा येथील बालाकोट येथील दहशतवादी तळांवर हल्ला केला. यानंतर पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला, २४ पाकिस्तानी जेट भारताच्या हद्दीत येताना भारतीय लष्कराने त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले होते.
दरम्यान, श्रीनगर येथून ५२ स्कॉड्रॉन प्लेनमधून पायलट अभिनंदन वर्धमान पाकिस्तानच्या दिशेने झेपावले होते. त्यांचे प्लेन पाकिस्तानकडून निशाणा करण्यात आले. याचवेळी वर्धमान यांनी प्लेनमधून बाहेर उडी घेतली पण ते लाईन ऑफ कंट्रोलच्या आत उतरले, त्यानंतर त्यांना पाकिस्तान सैन्यानें ताब्यात घेतले होते. भारताने दबावतंत्राचा वापर केल्यानंतर अभिनंदन यांना पाकिस्तानने परत पाठवले होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.