Goa Boxing: गोव्याचा बॉक्सर प्रल्हादसमोर मोठे आव्हान! फिदरवेट बेल्टसाठी पुण्यातील अमित कुमारशी करणार दोन हात

Pralhad Panda: इंडियन बॉक्सिंग काऊंसिलचा (आयबीसी) पश्चिम विभागातील फिदरवेट गटातील विजेता गोव्याचा बॉक्सर प्रल्हाद पांडा याच्यासमोर किताब राखण्याचे आव्हान आहे.
Goa Boxing Pralhad Panda
Goa Boxer Pralhad PandaDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Boxing Club-पणजी: इंडियन बॉक्सिंग काऊंसिलचा (आयबीसी) पश्चिम विभागातील फिदरवेट गटातील विजेता गोव्याचा बॉक्सर प्रल्हाद पांडा याच्यासमोर किताब राखण्याचे आव्हान आहे.

२८ जून रोजी मिरामार येथील क्लब टेनिस द गास्पार डायस येथे होणाऱ्या सुसेगादो स्ट्राईक फाईट नाईट-३ मध्ये तो बॉक्सिंग रिंगमध्ये आव्हानवीरास सामोरा जाईल.

Goa Boxing Pralhad Panda
Noida Boxing Championship: गोव्याच्या मुलींचा नोएडात डंका! बॉक्सिंग स्पर्धेत एक सुवर्ण, दोन कांस्यची कमाई

प्रल्हाद २९ वर्षीय असून बस्तोडा येथील आहे. त्याला फिदरवेट बेल्टसाठी पुण्यातील २७ वर्षीय अमित कुमार आव्हान देईल. ``माझी कर्मभूमी असलेल्या गोव्यात होणाऱ्या लढतीत किताब राखणे माझ्यासाठी खूपच महत्त्वाचे आहे. मी नक्कीच संधी साधणार,`` असा विश्वास प्रल्हाद याने व्यक्त केला. प्रल्हादची आगामी लढत आठ फेऱ्यांची असेल.

Goa Boxing Pralhad Panda
Boxing Championship: गोव्याच्या लक्ष्मीची भारतीय बॉक्सिंग संघात निवड; एएसबीसी स्पर्धेसाठी संयुक्त अरब अमिरातीला रवाना

सुसेगादो स्ट्राईक फाईट नाईट-३ मध्ये गोव्यातील अन्य एक बॉक्सरही रिंगमध्ये उतरणार आहे. चिंबल येथील तीस वर्षीय कैलास गावस मुंबईतील विरार येथील २२ वर्षीय प्रसाद कटनूर याच्याविरुद्ध लढेल. या स्पर्धेत देशभरातील एकूण १२ बॉक्सरमध्ये चुरस असेल. चार महिला बॉक्सरचाही या स्पर्धेत सहभाग आहे. महिलांच दोन लढती होतील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com