PM Shehbaz Sharif  Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan: दहशतवादाचा खात्मा करण्यासाठी PAK सुरु करणार मोठे ऑपरेशन, NSC बैठकीत निर्णय

Terrorism In Pakistan: पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी शुक्रवारी बोलावलेल्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या (NSC) महत्त्वपूर्ण बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

Manish Jadhav

Pakistan News: सातत्याने दहशतवादी हल्ल्यांचा सामना करत असलेल्या पाकिस्तानने आता देशातील सर्व प्रकारच्या दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी 'व्यापक मोहीम' राबविण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी शुक्रवारी बोलावलेल्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेच्या (NSC) महत्त्वपूर्ण बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान, पंतप्रधान शाहबाज शरीफ (Shehbaz Sharif) यांनी NSC च्या 41 व्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषलले, ज्यामध्ये कॅबिनेट मंत्री, मुख्यमंत्री, सेवा प्रमुख, गुप्तचर प्रमुख आणि इतर महत्वाचे प्रशासकीय आणि लष्करी अधिकारी उपस्थित होते. NSC ही राष्ट्रीय सुरक्षेच्या बाबतीत प्रमुख निर्णय घेणारी संस्था म्हणून काम करते.

पंतप्रधान कार्यालयाकडून शुक्रवारी जारी करण्यात आलेल्या एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, "संपूर्ण देश आणि सरकारच्या पाठिंब्याने एक व्यापक मोहीम सुरु करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला, ज्यामुळे देशाला नव्या जोमाने दहशतवादाच्या संकटातून मुक्त केले जाईल."

'सर्व उपाययोजनांचा समावेश केला जाईल'

त्यात म्हटले आहे की, पाकिस्तानमधून सर्व प्रकारच्या दहशतवादाचा नायनाट करण्याच्या मोहिमेमध्ये राजकीय, राजनैतिक, सुरक्षा, आर्थिक आणि सामाजिक स्तरावरील उपाययोजनांचा समावेश असेल.

पुढे, प्रसिद्धी पत्रकात असे म्हटले आहे की, एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे, जी दोन आठवड्यांच्या आत ऑपरेशनची अंमलबजावणी आणि पॅरामीटर्स संदर्भात शिफारसी सादर करेल.

पाकिस्तानमध्ये दहशतवादी हल्ले वाढत आहेत

द न्यूज इंटरनॅशनलच्या म्हणण्यानुसार, या वर्षी जानेवारी ते मार्चपर्यंत खैबर पख्तूनख्वा (केपी) मध्ये विविध हल्ल्यांमध्ये 127 पोलीस अधिकारी मारले गेले.

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, त्यापैकी 116 जानेवारीमध्ये, दोन फेब्रुवारीमध्ये आणि नऊ मार्चमध्ये ठार झाले. 2023 च्या पहिल्या तिमाहीत झालेल्या हल्ल्यांमध्ये किमान चार पोलीस (Police) उपअधीक्षक (DSPs) आणि काही कनिष्ठ अधिकारी यांचा समावेश आहे. त्या तुलनेत 2017 मध्ये 36, 2018 मध्ये 30, 2019 मध्ये 38, 2020 मध्ये 28 आणि 2021 मध्ये 59 पोलिसांवर हल्ले झाले.

तथापि, 2022 मध्ये पोलिसांच्या मृत्यूची संख्या 120 पेक्षा जास्त झाली आहे आणि 2023 च्या पहिल्या तिमाहीत मृत्यूची संख्या गेल्या वर्षीच्या संख्येपेक्षा जास्त आहे. गेल्या काही वर्षांपासून अनेक भागातील पोलिस चौक्यांवर ग्रेनेड आणि अवजड शस्त्रांनी हल्ले होत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Beti Ferry Boat: 'बेती' का बुडाली? तपास पुन्हा 'बंदर कप्तान'कडे, प्राथमिक चौकशीत मानवी चुकीने दुर्घटनेचा निष्कर्ष

Comunidade Land: कोमुनिदादच्या जमिनीत हस्तक्षेप नकोच! आसगाव येथे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सरकारच्या निर्णयाला कडाडून विरोध

Goa Fake Police: तोतया पोलिसांचा सुळसुळाट; भरदिवसा दोघांचे दागिने हातोहात लंपास, ज्‍येष्‍ठांसह महिला 'टार्गेट'वर

Paper Leak Issue: विद्यापीठातील प्रश्‍नपत्रिकांची चोरी उघड; चौकशी समितीचा भौतिकशास्त्राचे प्राध्यापक, डीन, रजिस्ट्रार, कुलगुरूंवर ठपका

Rashi Bhavishya 17 July 2025: प्रवासाचे योग, प्रेमसंबंध अधिक घट्ट होतील; मान-सन्मान वाढेल

SCROLL FOR NEXT