Arzoo Kazmi News: पाकिस्तानी पत्रकार आरजू काझमी यांचे एक ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या ट्विटमध्ये 1947 च्या फाळणीच्या वेळी भारत सोडून पाकिस्तानात जाण्याच्या आपल्या कुटुंबाच्या निर्णयावर त्या पश्चाताप करत आहेत.
दरम्यान, आरजू काझमी यांनी हे ट्विट 1 एप्रिलला केले होते. यामध्ये त्या लिहितात की, 'मला आणि कुटुंबातील इतर सदस्यांना वाटते की, पाकिस्तानमध्ये त्यांचे भविष्य नाही. माझे आजोबा आणि त्यांचे कुटुंब चांगल्या भविष्यासाठी प्रयागराज आणि दिल्ली येथून पाकिस्तानात स्थलांतरित झाले होते. वाट लागली, आजोबा...'
दुसरीकडे, या ट्विटला 16 हजारांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे आणि 2 हजारांहून अधिक लोकांनी रिट्विट केले आहे. या ट्विटवर मोठ्या संख्येने लोकांनी आपल्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.
काझमी अनेकदा भारतीय टीव्ही चॅनलवर दिसल्या आहेत. त्यांनी अनेक मुद्द्यांवर भारताचे कौतुकही केले आहे. विशेष म्हणजे, त्या पाकिस्तान (Pakistan) सरकार आणि लष्कराच्या टीकाकार राहिल्या आहेत. त्यांनी पंजाब युनिव्हर्सिटीमधून पत्रकारितेत पदवी मिळवली असून अनेक माध्यम संस्थांशी त्या संबंधित आहेत.
काझमी यांनी हे ट्विट अशा वेळी केले आहे, जेव्हा पाकिस्तान अत्यंत कठीण टप्प्यातून जात आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे.
महागाईने (Inflation) कळस गाठला आहे. खाद्यपदार्थांच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत. शासनाकडून पीठ वाटप होत असताना लोकांना लांबच लांब रांगेत उभे राहावे लागत आहे.
अशा अनेक ठिकाणी पीठ मिळवण्याच्या प्रयत्नात लोकांना जीवही गमवावा लागला आहे. उद्योग-व्यवसायही ठप्प होत चालले आहेत.
द डॉनच्या वृत्तानुसार, पाकिस्तानमध्ये 30 मोबाइल असेंब्ली युनिट्स बंद झाले आहेत, ज्यामुळे 20,000 नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.