Pakistan Protest Video Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan Protest Video: रस्त्यावर पोलिसांना मारहाण, AK-47 मधून होतोय गोळ्यांचा वर्षाव; PAK मध्ये जमावाचा नंगानाच

Pakistan: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अटकेने पाकिस्तानात राजकीय अनागोंदी माजली आहे.

Manish Jadhav

Pakistan Protest Video: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अटकेने पाकिस्तानात राजकीय अनागोंदी माजली आहे. इम्रान यांच्या पक्षाचे समर्थक रस्त्यावर उतरले आहेत.

विशेष म्हणजे, इम्रान यांच्या समर्थकांनी संपूर्ण देशाला हिंसाचाराच्या आगीत ढकलले आहे. काही ठिकाणी ए-47 मधून गोळ्या झाडल्या जात आहेत, तर काही ठिकाणी पोलिसांचा पाठलाग करुन मारहाण केली जात आहे. ट्विटरवर असे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

दरम्यान, पाकिस्तानच्या दोन प्रांतात प्रत्यक्षात लष्कराला रस्त्यावर उतरावे लागले. यावरुन तुम्ही अंदाज लावू शकता की, परिस्थिती किती भयानक आहे.

सर्वप्रथम पंजाबमधील (Punjab) लाहोरसारख्या मोठ्या शहरात इम्रान समर्थकांनी जाळपोळ, तोडफोड केली.

यानंतर काही वेळातच खैबर पख्तूनख्वामधील परिस्थितीही अनियंत्रित झाल्याची बातमी आली, त्यामुळे तिथेही लष्कर तैनात करण्यात आले. पाकिस्तानातील प्रमुख शहरांमधील व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहेत.

दुसरीकडे, पाकिस्तानमध्ये (Pakistan) परिस्थिती किती बिघडली आहे, हे व्हिडिओमध्ये दिसत आहे. जमाव पोलिसांना मारहाण करताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. पोलिसांना लाठ्या-काठ्यांनी मारहाण केली जात आहे. काही लोक त्यांच्यावर दगडफेक करतानाही दिसत आहेत.

पोलिसांना मारहाण करतानाचा जमावाचा व्हिडिओ...

पेशावर पेटले

पेशावरमध्ये अनेक ठिकाणी इम्रान यांचे समर्थक AK-47 घेऊन गोळीबार करताना दिसत आहेत. याशिवाय आंदोलकांनी रेडिओच्या इमारतीलाही आग लावली.

पेशावरमधील परिस्थिती इतकी बिघडली आहे की, तिथे आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय डझनभर लोक जखमी झाले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

SCROLL FOR NEXT