Pakistan bus accident kills 17 passengers Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan Bus Accident: एक्सप्रेसवेवर काळाचा थरार, दोन बसेसची जोरदार धडक! पाकिस्तानात भीषण अपघात; 17 प्रवाशांचा मृत्यू, 5 जण गंभीर जखमी

Two Buses Collision Swat Valley Pakistan: पाकिस्तानच्या उत्तर-पश्चिम भागातील मर्दान जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली.

Manish Jadhav

Pakistan Swat Expressway Bus Accident: पाकिस्तानच्या उत्तर-पश्चिम भागातील मर्दान जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली. येथील स्वात एक्सप्रेसवेवर दोन बसेसमध्ये झालेल्या भीषण अपघातात 17 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर 5 जण गंभीर जखमी झाले. हा अपघात सोमवारी घडला असून, एका तांत्रिक बिघाडामुळे रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बसला दुसऱ्या एका सुस्साट वेगाने येणाऱ्या बसने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा अनर्थ ओढवला. या अपघातातील मृत हे प्रामुख्याने अप्पर दीर आणि बाजौर जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले. अचानक घडलेल्या या दुर्घटनेमुळे महामार्गावर चेंगराचेंगरी आणि रडारड सुरु झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त झालेली एक प्रवासी बस स्वात खोऱ्यातील नयनरम्य पर्यटन स्थळाकडे प्रवाशांना घेऊन जात होती. मात्र, वाटेतच या बसच्या जनरेटरमध्ये अचानक बिघाड झाला. त्यामुळे चालकाने बस स्वात एक्सप्रेसवेच्या कडेला उभी केली होती. बसमधील तांत्रिक काम सुरु असतानाच, मागून येणाऱ्या एका अतिवेगवान बसच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ही बस रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या बसला जोरदार धडकली. ही धडक इतकी भीषण होती की, दोन्ही बसेसचा चक्काचूर झाला आणि 17 प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक बचाव पथक आणि पोलिसांनी तातडीने धाव घेत मदतकार्य सुरु केले. जखमींना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. अद्याप मृतांची अधिकृत ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.

दरम्यान, आशियाई देशांमध्ये रस्ते अपघातांचे सत्र थांबताना दिसत नाहीये, कारण अशीच एक भीषण दुर्घटना शेजारील देश बांगलादेशातही घडली. बांगलादेशातील ढाका येथून 83 किलोमीटर अंतरावर मजुरांनी भरलेला एक ट्रक अनियंत्रित होऊन पलटल्याने 15 लोकांचा मृत्यू झाला, तर 10 जण जखमी झाले. हे सर्व मजूर ईदचा सण साजरा करण्यासाठी ट्रकमध्ये लिफ्ट घेऊन आपल्या गावी चालले होते, मात्र वाटेतच चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.

एकाच दिवशी पाकिस्तान (Pakistan) आणि बांगलादेशात झालेल्या या दोन वेगवेगळ्या मोठ्या रस्ते अपघातांमुळे एकूण 32 निष्पाप लोकांना आपला जीव गमवावा लागला असून, दक्षिण आशियातील खराब रस्ते सुरक्षा आणि वेग मर्यादांच्या उल्लंघनाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT