PM Shehbaz Sharif Dainik Gomantak
ग्लोबल

Pakistan Political Crisis: पाकिस्तानात पुन्हा मार्शल लॉ लागू होणार? शाहबाज मंत्रिमंडळात मोठी खलबतं

Pakistan: पाकिस्तानातील सध्याची परिस्थिती पाहता आणीबाणी लागू केली जाऊ शकते. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेतली.

Manish Jadhav

Pakistan Political Crisis: पाकिस्तानातील सध्याची परिस्थिती पाहता आणीबाणी लागू केली जाऊ शकते. पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी मंत्रिमंडळाची बैठक घेतली. या बैठकीत देशात आणीबाणी लागू करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज यांनी फेडरल कॅबिनेटला संबोधित केले.

यावेळी ते म्हणाले की, 'पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफचे अध्यक्ष इम्रान खान आणि त्यांचा पक्ष दोघेही खोटे आहेत.' मंत्रिमंडळाच्या बैठकीत शाहबाज यांनी इम्रान सरकार पडल्याचाही उल्लेख केला आणि सरकार पाडण्यासाठी केलेले आरोप पूर्णपणे खोटे असल्याचे सांगितले.

शरीफ पुढे म्हणाले की, 'पीटीआय नेतृत्व देशाला विनाशाकडे ढकलण्याचा प्रयत्न करत आहे. देश आधीच आव्हानांचा सामना करत आहे.' त्यांनी पुढे सांगितले की, 'आपली आर्थिक स्थिती अत्यंत बिकट आहे. आम्हाला अनेक आव्हाने वारसाहक्काने मिळाली आहेत, त्यामुळे आर्थिक स्थिती अजूनही खालावत आहे.'

दुसरीकडे, इम्रान यांच्यावर थेट हल्ला करत शाहबाज म्हणाले की, 'मागील सरकारने आयएमएफसोबत केलेल्या कराराचे उल्लंघन केले. आता आम्ही त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करत आहोत.'

न्यायालयाच्या मौनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे

मंत्रिमंडळाच्या बैठकीत बोलताना शाहबाज यांनी न्यायालयाच्या मौनावरही प्रश्न उपस्थित केले. इम्रान यांच्या सरकारमध्ये (Government) आमच्या पक्षाच्या नेत्यांवर सूड उगवला गेला, तेव्हा न्यायालयाने मौन पाळले, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. "आम्हाला तुरुंगात पाठवले जात असताना त्यांनी याची कधी दखल घेतली होती का," असा सवालही त्यांनी विचारला.

तसेच, इम्रान यांच्या अटकेनंतर झालेल्या निदर्शनांवर पंतप्रधानांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी सांगितले की, 1973 नंतर पहिल्यांदाच पाकिस्तानमध्ये हे दिसले आहे.

त्यांनी बेनझीर भुट्टो यांच्या कालखंडाचे स्मरण करुन सांगितले की, बेनझीर भुट्टो यांच्या मृत्यूनंतरही निदर्शने झाली, परंतु कोणीही लष्कराला टार्गेट केले नव्हते.

संरक्षणमंत्र्यांनी आणीबाणीबाबतही चर्चा केली

तत्पूर्वी, पाकिस्तानचे (Pakistan) संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले की, 'देशातील परिस्थिती अशीच राहिली तर आणीबाणी लागू होण्याची शक्यता आहे.' किंबहुना, त्यांना पाकिस्तानमध्ये आणीबाणी लागू करण्याच्या अफवांवर विचारले असता ते म्हणाले की, 'जर परिस्थिती अशीच राहिली तर आणीबाणी हा घटनात्मक पर्याय आहे.'

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT